कंधार दिनांक 21 मे( प्रतिनिधी)
- भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून आज दिनांक 21 मे रोजी पानभोसी लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, मिनरल वाटर बिस्किट,व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना सेनेटायझर चे वाटप नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी गावच्या सरपंच सौ. राजश्रीताई मनोहर पाटील भोसीकर,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवकुमार भोसीकर, शिवराज पाटील भोसीकर,माजी सरपंच प्रतिनिधी मनमत नाईकवाडे, त्र्यंबक भोसीकर, संभाआप्पा स्वामी,पोलीस पाटील शेख इसाक,राजेश्वर गोंड, शंकर घोडके, शेख शब्बीर सर, वैजनाथ भोसीकर राजाराम नाईकवाडे, राजकुमार भोसीकर,शेख सुलतान आदीसह आरोग्य केंद्रातील कर्मचारी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने सामाजिक उपक्रमाने पुण्यतिथी साजरी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत संजय भोसीकर यांनी वरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी लसीकरणासाठी गावातील नागरिक व महिला उपस्थित होते याप्रसंगी स्वर्गवासी राजीव गांधी यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना संजय भोसीकर यांनी कोरोना महामारी च्या या संकट काळात नागरिकांनी शासनाच्या त्रिसूत्री चे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, आरोग्य सुविधा गाओगावी उपलब्ध आसुन या सुविधे चा लाभ नागरिकांनी घ्यावा.
या प्रसंगी नागरिकांना मार्गदर्शन करताना सौ. वर्षाताई म्हणाल्या की कोरोना महामारी पासून बचाव करण्याचा प्रभावी असा उपाय म्हणून लसिकरण आहे नागरिकांनी विशेष करून महिलांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे ही लस अत्यंत सुरक्षित असून या लसीमुळे कुठल्या प्रकारचा त्रास अपाय होणार नाही व होत नाही है एक कोरोना विरुद्ध प्रभावी अस्त्र असून या संकट काळात आपल्या बचावाचे एक मोठे अस्त्र आहे तरी मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता महिलांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घेऊन व शासनाच्या त्रिसूत्रीचा पालन करून आपला व आपल्या कुटुंबीयांच्या या महामारीतून बचाव करावाअसे सौ. वर्षाताई मनाल्या याप्रसंगी सरपंच सौ. राजश्रीताई यांनी गावातील सर्व नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवकुमार भोसीकर यांनी आभार प्रदर्शन केले.