कंधार ; प्रतिनिधी
लोहा कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांचे सोशल मिडीया प्रमुख तथा खंदे समर्थक कंधार तालुक्यातील नंदनवन येथिल भुमिपुत्र योगेश पाटील नंदनवनकर यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रत्येकाशी तोलुन मोलुन संभाषण ठेवणारे, स्मितभाषी, सतत हसतमुख चेहरा, गोरगरीब जनतेचे सतत प्रश्न सोडवणारे, कष्टकरी शेतकरी, जनतेच्या न्याय व हक्कासाठी सतत तळमळीने प्रश्न सोडवणारे आ. श्यामसुंदर शिंदे साहेब यांचे प्रसिध्दी प्रमुख योगेश पाटील नंदनवनकर यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नंदनवनकर यांनी सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल
त्यांच्या कार्याची दखल घेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील नंदनवनकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल आ. श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे, रमेश माळी, श्याम आण्णा पवार, बालाजी ईसादकर, आधु पेठकर, सुधाकर सातपुते, सचिन कदम, मारोती एजगे, विठ्ठल कतरे, शरद भागानागरे, शेख शेरु,बंटी गादेकर, नीतीन पाटील व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.