कंधार ; प्रतिनिधी
घोडज तालुका कंधार येथिल भुमिपुत्र बालाजी लाडेकर यांची नुकतीच लेफ्टनंट आफिसर पदावर निवड झाली असून त्याबद्दल बालाजी लाडेकर यांचा व त्यांच्या आई वडिलांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने आज मंगळवार दि.२५ मे रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
त्यावेळी जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड, कंधार तालुका अध्यक्ष आर्जून कांबळे ,उपध्यक्ष शेख आजीज ,सचीव पोचीराम वाघमारे, कार्यअध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, माजी सैनिक उमाजी पंदलवाड ,सेवारत सैनिक शिवहार कांगणे, सेवारत सैनिक दत्ता दांडेकर ,सेवारत सैनिक व्यंकटेश श्रीमंगले, पोलिस पाटील भिमराव संभाजी लाडेकर , उपसरपंच
आत्माराम संभाजी लाडेकर,
आणि गावातील समाज बांधव उपस्थित होते..