कंधार ; प्रतिनिधी
पोलीस स्टेशन कंधार येथे पोलीस निरीक्षक व्ही.के. झुंजारे रुजू झाले त्याबद्दल फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी मंगळवार दि.२५ मे रोजी सत्कार केला.
कंधार येथील रिक्त असलेल्या पदावर पोलिस निरीक्षक पदी व्ही के .झुंजारे यांची नुकतीच पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नियुक्ती केली आहे. त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.गेल्या असून आठ महिन्यापासून पोलीस निरीक्षक विकास जाधव यांची कंधार येथून बदली झाली होती. तेव्हापासून हे पद प्रभारी संग्राम जाधव यांच्या कडे होते.
पोलीस स्टेशन कंधार येथे पीआय झुंजारे व्ही.के. रुजू झाले त्याबद्दल फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी सत्कार केला यावेळी ,पप्पू नळगे ,ग्रामपंचायतीचे उपसरपंच दयानंद उर्फ तुळशीदास ,रामजी रसवते ,माजी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर विठ्ठलराव मंगनाळे, लक्ष्मण गुरुसुडे , पत्रकार शेख शादुल आदी सर्वजण उपस्थित होते.