लोहा प्रतिनिधी,
आज दिनांक 25/05/2021 रोजी सकाळी ठिक 08:00 ते 09.30 या दरम्यान आमचे प्रेरणास्थान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड चे सन्माननीय प्राचार्य डाॕ.रविंद्र अंबेकर साहेब, नांदेड जिल्हा उपशिक्षणाधिकारी तथा भोकर गट साधन केंद्राचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री दत्तात्रय मठपती साहेब, तसेच डायट नांदेड चे अधिव्याख्याता तथा लोहा तालुका संपर्क अधिकारी सन्माननीय श्री चंद्रकांत धुमाळे साहेब, लोहा गट साधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री रवींद्र सोनटक्के साहेब* यांचे मार्गदर्शनात गट साधन केंद्र लोहा च्या वतीने श्री संत गाडगेबाबा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, लोहा येथील इयत्ता नववी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज दुसऱ्या आँनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. रवींद्र सोनटक्के साहेब, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, बीट लोहा-1, श्री सर्जेराव टेकाळे, कन्या लोहा केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री बाबुरावजी फसमले, श्री संत गाडगेबाबा हायस्कुलचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री बडगिरे सर, प्रस्तुत शाळेतील जेष्ठ आणि तज्ज्ञशिक्षक सन्माननीय श्री बी. डी. जाधव सर, ईतर शिक्षक व इयत्ता नववी ते बारावीत शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक यासह समग्र शिक्षा लोहा चे विषय तज्ञ, विशेष शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला संस्थेचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर साहेब यांनी या आँनलाईन कार्यशाळेचे महत्त्व व महाकरिअर पोर्टल याविषयी सर्वांना थोडक्यात पण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी महाकरिअर पोर्टल आपल्या विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी किती उपयुक्त आहे. भोकर तालुक्यात विद्यार्थी लॉगिन वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न यावर मार्गदर्शन केले. तसेच एक दिवस लोहा तालुक्यातून पाच विद्यार्थ्याना तरी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळेल यासाठी सर्व विद्यार्थ्यांना लाँगीन होण्यासाठी प्रेरणा दिली.
आजच्या कार्यशाळेस तज्ज्ञ सुलभक श्री. परमेश्वर सोळंके सर यांनी पूर्णवेळ उपस्थित सर्वांना महाकरिअर पोर्टल वर लाँगीन कसे करावे, विविध कोर्स, त्यासाठी निवाडावयाचे कालेज, विविध प्रवेश परिक्षा, आर्थिक मदतीसाठी असणाऱ्या विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती परिक्षा, त्या कशा शोधून अप्लाय करावे, याविषयी प्रत्यक्ष डेमोच्या माध्यमातून सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थी पालक यांच्या शंकांचे निरसन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. बडगिरे सर, जेष्ठ शिक्षक श्री बी. डी. जाधव सर यांनी सर्व विदयार्थ्यांपर्यंत महाकरिअर पोर्टल पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
आज एकंदरपणे 85च्या आसपास विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. अशा या महाकरिअर पोर्टल कार्यशाळेचे आभार, कन्या लोहा केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री. बाबुरावजी फसमले सर यांनी केले.