नांदेड ; प्रतिनिधी
स्व. खासदार राजीव सातव यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानी नांदेड जिल्हाचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट दिली. माजी राज्यमंत्री रजनीताई सातव व डॉ.प्रज्ञा सातव यांचे सांत्वन केले .
यावेळी कळमनुरी माजी आमदार गजानन घुगे, भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भीलवंडे, मिलिंद देशमुख, सुरेश राठोड, भाजपा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, प्रा.सुनील नानवटे, कळमनुरी येथील अशोक सांगेकर, रुपेश कदम, विक्रम शिंदे, आमिष दरक, राहुल मेने, अंकुश पाटील, प्रतीक साकळे, कल्याण भिसे आदींची उपस्थिती होती.
छायाचित्र-सचिन डोंगळीकर