पुर्वी चित्रपटास रे सेन्सॉर बोर्ड,
आता लागु करा न्युज चॅनलन्सना! बातमी कोणती खरी का खोटी? उताविळ ब्रेकिंग न्यूज वाल्यांना! पुर्वीचे अर्धा तासांचे बातमीपत्र, आज पायलीचे पंधरा मोजतांना? तेंव्हाही घडामोडी समजत होत्या, सध्या मात्र ब्रेकिंग न्यूजचा जमाना? टीआरपी मिळविण्या स्वार्थापायी, अनेक चॅनल्सची होते पुर्ण तमन्ना! सामाजिक सलोखा अबाधित,
ठेवणे ब्रेकिंग न्यूजना का जमेना?
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा