कंधार :- सागर डोंगरजकर
केंद्रातील भाजपा सरकारचे सात वर्ष पूर्ण केल्याच्या अनुषंगाने कोरोना काळात सेवा कार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला या वेळी भाजपा महिला मोर्च्या च्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई चिखलीकर म्हणाल्या की भाजपा ही समजतील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहते तर कोरोना काळात रुग्णासह प्रत्येक नागरिकाची काळजी करत सेवा कार्य भाजपा च्या प्रत्येक कार्यकर्त्याने केले असे या वेळी त्यांनी आपले मनोदय व्यक्त केले तर यावेळे खासदार सुधाकर शृंगारे यांनी कोरोना योद्धांचे ताळेबंदी काळात त्यांनी केलेल्या कार्या बद्दल अभिनंदन केले.
दि 30 मे रोजी कंधार येथे, केंद्रातील भाजपा सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने भाजपा कंधार च्या वतीने कोरोना काळात सेवाकार्य केलेल्या कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला त्यात नगरपालिकेचे स्वछता महिला कर्मचारी यांना मास्क ,स्यानिटायझर व साडी भेट देण्यात आली त्यावेळी भाजपा महिला मोर्च्या च्या प्रदेशउपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर ह्या म्हणाल्या की भारतीय जनता पार्टी ही सर्वसमन्या च्या मदतीसाठी सदैव अग्रेसिव्ह राहते ,या देशाती प्रत्येक शेवटच्या व्यक्ती चा विकास व्हावा या साठी सदैव प्रयत्नशील राहते कोरोना काळात प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या साठी प्रयत्न करत होती व करत राहील कोरोना काळात स्वछता कर्मचारी ,डॉक्टर वैध्यकीय कर्मचारी,पत्रकार पोलिस यांच्या अतुल्य योगदाना मुळेच आपण सर्व मिळून कोरोनवर मात करू शकलो असे ते यावेळी म्हणाले .
यावेळी लातूर लोकसभरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी कोरोना योद्धांचे अभिनंदन केले .
या वेळी खासदार सुधाकर शृंगारे यांनी ग्रामीण रुग्णालय व कोविड रुग्णालयास भेट दिली व तेथील डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी चरच्या करून त्यांच्या अडचणी ऐकून त्या सवडवण्याच्या तात्काळ सूचना प्रशासनास दिल्या.
या कर्यक्रमास महिलामोर्च्या च्या जिल्हाध्यक्षा चित्रलेखा गोरे,भाजपा महिलामोर्च्या औरंगाबाद च्या जिल्हाध्यक्षा अमृता पलोदकर,कंधार नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म.जफिरोद्दीन बाउद्दीन, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहरध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,सरचिटणीस किशनराव डफडे,सरचिटणीस मधुकर डांगे,नगरसेवक सुनील कांबळे,नगरसेविका अनिता कदम,ओबीसी आघाडीच्या अध्यक्षा सुनंदा वंजे,युवामोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,युवा मोर्च्या तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिर,महंमद जफर,चेतन केंद्रे,भाजपा शिक्षक नेते राजहांस शहापुरे,बालाजी तोरणे,अँड. सागर डोंगरजकर,रजत शहापुरे,प्रवीण बनसोडे, राजू लाडेकर , बद्रीनाथ राजुरे, भानुदास पवार, आत्माराम परांडे, माणिक बोरकर
आदी उपस्थित होते.
