नांदेड भाजपाच्या वतिने स्वच्छतेची दिली शपथ ;पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपाचे विविध कार्यक्रम संपन्न

भारतातील सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पंतप्रधानपदा ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी खासदार चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रविण मसाले यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात चार विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यतत्पर असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला अभिनव पद्धतीने मानवंदना दिली.

सकाळी नऊ वाजता नांदेड बस स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते करण्यात आली. सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. एका तासात बस स्थानक परिसर अतिशय स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता अभियानामध्ये विजय गंभीरे,धीरज स्वामी, प्रभू कपाटे, चंचलसिंग जट, सिद्धार्थ धुतराज ,सुरेश निलावार, कुणाल गजभारे, व्यंकटेश जिंदम, साहेबराव गायकवाड ,अरुण काबरा, नितीन कुलकर्णी, संतोष भारती, माधव लुटे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर सर्वांची चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी 11 वाजता नांदेड चे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री गुरू गोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वितरित करण्यात आले दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 72 दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे. रविवारी भाजपा जिल्हा चिटणीस चंचल सिंग जट यांच्यातर्फे साहित्य वितरण करण्यात आले.

दुपारी बारा वाजता नांदेड रेल्वे स्थानक येथे परप्रांतीय प्रवासी मजदुरांना जेवणाचे डबे जिल्हा चिटणीस मनोज जाधव भाजपा युती आघाडी जिल्हाध्यक्ष महादेवी मठपती यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

सायंकाळी सहा वाजता दिलीप ठाकूर राहत असलेल्या शिवशक्ती नगर मिल रोड परिसरातील नागरिकांची घरोघरी जाऊन डिजिटल थर्मामीटर व ऑक्सी मीटरने तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मास व सॅनिटायझर चे वितरण करण्यात आले. सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दिलीप ठाकूर यांनी मोदींच्या यशस्वी कारकीर्दी निमित्त घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
( छाया :करणसिंह बैस, व्यंकटेश वाकोडीकर, सचिन डोंगळीकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *