गोपीनाथराव मुंडे स्मृतिभवन बांधकामास सुरुवात
माळाकोळी. एकनाथ तिडके
माळाकोळी येथे लोकनेते गोपीनाथ राव मुंडे यांचे स्मृती भवन साकारत आहे या स्मृती भवन ठिकाणी व्यायाम शाळा व ग्रंथालय उभारले जाणार आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदाई होते त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे नुकसान झाले आहे या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे कार्य जिवंत राहावे व तरुणांना प्रेरणा देणार स्मारक निर्माण होत आहे त्यामुळे अशा व इतर लोकोपयोगी कामांना निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी मी घेईल तसेच मतदार संघातील पिण्याचे पाणी रोजगार रस्ते व सिंचन या कामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याचे काम आपण करणार आहोत असे प्रतिपादन आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले ते माळाकोळी येथे गोपीनाथराव मुंडे स्मृतिभवन विस्तारीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गोविंद अाण्णा केंद्रे , भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संदीप उमरेकर, श्याम अण्णा पवार ,सरपंच मोहन काका शूर , पंचायत समिती सदस्य जनार्दन तिडके,सुधाकर सातपुते, सरपंच केरबा केंद्रे, सरपंच पांडुरंग नागरगोजे ,सरपंच लक्ष्मण केंद्रे , उपसरपंच निखिल मस्के ,नागेश इलाल, शुभम कदम ,केशव तिडके ,अरुण सोनटक्के ,चंद्रकांत केंद्रे ,वैजनाथ केंद्रे, संजय तिडके , सखाराम केंद्रे ,सखाराम तिडके,मनोज भालेराव ,कौसाजी साखरे, गणपती तिडके, माजी सरपंच व्यंकटराव तिडके ,भास्कर तिडके ,कृष्णा केंद्रे पुंडलिकराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम आमदार शामसुंदर शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या 25 लक्ष रुपयाच्या स्मारक विस्तारीकरण कामाचा शुभारंभ आमदार शामसुंदर शिंदे व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले लोहा कंधार तालुक्याचे आजपर्यंतचे आमदार बहुतांश वेळा विरोधी पक्षातले असल्यामुळे तेथील विकास खुंटला होता हा भाग दुर्लक्षित राहिला होता, मात्र यापुढे या दुष्काळी भागात रस्ते सिंचन पाणी रोजगार या कामांना प्राधान्य देणार असून यासाठी लागेल तेवढा निधी आपण उपलब्ध करणार आहोत. यावेळी बोलताना माजी आमदार गोविंदांना केंद्रे म्हणाले मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या गोपीनाथराव मुंडे स्मृती भवन कामाचा आज शुभारंभ होत आहे याबाबत आम्हाला मनस्वी आनंद होत आहे महाराष्ट्रातील मोजक्या ठिकाणी होत असलेल्या आदर्श अशा स्मारकाचे हे काम असून यातून युवकांना व सामान्य नागरिकांना प्रेरणा देण्याचे काम होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील म्हणाले, निवडणूक काळात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता आम्ही करत असून त्यापैकीच एक गोपीनाथराव मुंडे स्मृतिभवन बांधकाम पूर्ण होत आहे याशिवाय दलित समाजासाठी समाज मंदिर माळाकोळी येथे पाणी पुरवठा योजना व रस्त्यांची कामे ही कामे तातडीने पूर्ण होणार आहेत.
यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,सरपंच मोहन शूर, जनार्धन तिडके, यांची भाषणे झाली प्रास्ताविक अमोल तिडके यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एकनाथ तिडके यांनी केले.
तीन महिन्यात 90 लक्ष निधी
माळाकोळी ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होऊन अवघे तीन महिने झाले आहेत या तीन महिन्याच्या कालावधीत माळाकोळी येथे विविध विकास कामासाठी 90 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, सरपंच मोहन काका शूर व ग्रामपंचायत सदस्य केशवराव तिडके यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी माळाकोळी येथे रस्ते पाणीपुरवठा व गोपीनाथराव मुंडे स्मृतिभवन बांधकाम या कामांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सरपंच मोहन शूर “, नुतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर तीन महिन्यात 90 लक्ष निधी आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे याशिवाय माळाकोळी येथील श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग देवस्थान तीर्थक्षेत्र दर्जा वाढ व पाणी पुरवठा योजना रस्ते या कामासाठी आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.


