नांदेड – सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा प्रमुख भदंत पंय्याबोधीजी थेरो, ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव साहेबराव इंगोले, अॅड. जयश्री पाटील, झेन सदावर्ते, ज्येष्ठ पत्रकार संभाजी सोनकांबळे, प्रकाश कांबळे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे, नागेश इंगोले यांच्यासह भिक्खू संघाची उपस्थिती होती.