सामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व्रतस्थपणे काम करणारा पत्रकार : संदीप कांबळे..

*गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आणि दलित, पददलित, उपेक्षित आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आपले हे पत्रकारितेचे हत्यार उपसून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्याच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे टाकून समाजाच्या उत्थानासाठी आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी आपली लेखणी झिजविणारे दैनिक कुलस्वामिनी संदेश चे नांदेड विभागीय संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हा महासचिव बंधूवर्य संदीप कांबळे हे नाव पत्रकारितेच्या क्षेत्रात आज परिचित होत आहे*…
कुलस्वामिनी संदेश या दैनिकात ते सध्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतात. थोड्या कालावधीतच कुलस्वामिनी संदेश या दैनिकाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम संदीप कांबळे यांच्या लेखणीच्या माध्यमातून होताना दिसते. संदीप कांबळे हे सामान्य कुटुंबात जन्माला आलेले असून त्यांचा जन्म ०५जून १९९० साली नरसी तालुका नायगाव येथे एका सामान्य कुटुंबात झाला.
संदीप कांबळे यांनी आपले महाविद्यालयीन आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून आता ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले नवे आयाम शोधतांना आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहोत. समाजाची तळमळ आणि कळकळ असणारा आणि सामान्य माणसाला हवाहवासा वाटणारा हा पत्रकार बंधु नेहमीच रंजल्या गांजल्या आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी आणि ज्याच्या पाठिमागे कोणीच नाही अशांच्या पाठीमागे उभा राहून मी तुमच्यासोबत आहे.ही जाणीव देणारा हा पत्रकार बंधु सामान्य माणसाला आपला वाटत आलेला आहे.
सामान्य माणसाच्या आणि तळागाळातील समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेऊन अगदी निष्ठापूर्वक त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटत आला आहे. खरंतर पत्रकारितेचे हे क्षेत्र उपेक्षित माणसाला न्याय मिळवून देणारे एक हत्यार असून त्या हत्याराचा उपयोग संदीप कांबळे यांनी अनेक ठिकाणी वापरून अशा उपेक्षित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून केला आहे.
संदीप कांबळे हे सामाजिक बांधिलकी जपणारे दृष्टे पत्रकार असून समाजाच्या अनेक प्रश्नासाठी ही ते सातत्याने आग्रही राहत आले आहेत. लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटने मध्ये काम करत असताना समाजाच्या प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी आणि समाजातील उच्च शिक्षणाच्या प्रसारणासाठी संदीप कांबळे यांनी नेहमीच आपले योगदान दिले आहे. आज पर्यंतच्या त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना अत्यंत सन्मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत.


अशा या व्रतस्थ पत्रकार बंधू चा म्हणजेच संदीप कांबळे यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने बंधूवर्य संदीप कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा….

आणि अभिनंदन…


●शिवा कांबळे ,नांदेड ●
(राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *