कंधार ; ता.प्र.
या कार्यक्रमास जि.प.चे बांधकाम व शिक्षण समिती सभापती संजयजी बेळगे, प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद नांदेड, माधव सलगर, शिक्षणाधिकारी (मा), जिल्हा परिषद नांदेड, सभापती सौ लक्ष्मीबाई घोरबांड पंचायत समिती कंधार, कैलास बळवंत , गटविकास अधिकारी वर्ग १, पंचायत समिती कंधार, माजी सभापती बालाजी पांडागळे, दत्तात्रय मठपती, उपशिक्षणाधिकारी (प्रा) तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोकर, मा. दिलीप बनसोडे उपशिक्षणाधिकारी (निरंतर) व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड, रविंद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती लोहा, सौ लता वडजे, उपसभापती पंचायत समिती कंधार, सत्यनारायण मानसपुरे पंचायत समिती सदस्य, उत्तम चव्हाण पंचायत समिती सदस्य सर्व सन्माननीय पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
“सुंदर माझे कार्यालय” उपक्रमाच्या मार्गदर्शन व आढावा वेळी गटसाधन केंद्र कंधार या कार्यालयामध्ये सर्व बिल्डींगची आतुन व बाहेरुन रंगरंगोटी तसेच गशिअ यांचे कक्षाची PUP करण्यात आली,तसेच गेल्या दहा वर्षापासुन बंद पडलेला हौद दुरुस्ती व नळ फीटींग करुन सर्व ठिकाणी दोन्ही शौचालय व हात धुण्यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
कार्यालयामध्ये बंद अवस्थेत असलेले सर्व लाईट व २२ फॅन दुरुस्ती तसेच एकुण २२ टयुबलाईट व ०५ नविन पंखे बसविण्यात आलेली आहे. महिला व परुषांसाठी स्वतंत्र शौचालय दुरुस्ती करुन त्यामध्ये पाण्याची व हात धुण्यासाठी स्वतंत्र सुविधा दुर्गंधीमुक्त शौचालय करण्यात आले. सदर बील्डींगमध्ये वर्षा रुतुमध्ये स्टॅब वर पाणी साचत असल्यामुळे त्यामधुन होत असलेली गळती थांबविण्यासाठी एकुण २० ठिकाणी आउटलेट करुन सदर बील्डींगचे गळती प्रमाण कमी करुन त्याची लाईफ वाढविण्यात आली आहे. तसेच कार्यालयातील सर्व साहित्य कपाट, खिडकी, दरवाजे यांना पेंट देवून शुशोभित करण्यात आलेली आहेत.
गटसाधन कार्यालयातील सर्व अभिलेखे वर्गनिहाय अ,ब,क,ड पध्दतीने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुव्यवस्थीत ठेवण्यात आलेली आहेत.कार्यालयाच्या बाहेरीत परीसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून परसलेली घाण, दुर्गधी व वाहण स्थळ थांबविण्यासाठी कार्यालयाच्या बाहेरील बाजुने १०० फुट चर खोदुन तो परिसर हा स्वच्छ करण्यात आला , कार्यालयातील आतील भागामध्ये वृक्षारोपण्ण करुन पक्ष्यांसाठी घरटे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.
वरील सर्व कामे ही कार्यालयातील गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख सर्व केंद्रीय मुख्याध्यापक व कार्यालयातील सर्व आस्थापनेचे कर्मचारी व सेवक (शालेय पोषण आहार, जिप आस्थापना, समग्र शिक्षा) यांच्या योगदानाने शासनाचा कोणताही निधी न वापरता पार पाडण्यात आलेली आहेत. तसेच अनेक कामे ही प्रगतीपथावर आहेत.या कार्यक्रमाचे प्रास्तविक गटशिक्षणअधिकारी संजय यरमे यांनी केले व कार्यक्रमाची रुपरेषा सांगून कंधार तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न चालू असल्याची माहीती यावेळी दिली.