फुलवळ येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.

फुलवळ ;( धोंडीबा बोरगावे )

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा ता. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला , याच दिवसाचे औचित्य म्हणून यावर्षी पासून ता. ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा करावा असा महाराष्ट्र राज्य सरकारने अध्यादेश काढला , त्याचेच पालन करत आज फुलवळ ग्राम पंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कलश पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन सामुदायिकपणे राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.

यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते , ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे , ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे , प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , शांताबाई जेलेवाड , नागनाथ मंगनाळे , मु. अ. बसवेश्वर मंगनाळे , बापूराव मंगनाळे , ग्यानोबा मंगनाळे , कामाजी मंगनाळे , मोकिंद देवकांबळे , हिरकांत मंगनाळे , कैलास मंगनाळे , बाळू जेलेवाड , माधव बनसोडे , सागर मंगनाळे , जगदीश मंगनाळे , उद्धव बसवंते , संतोष सोमासे , पत्रकार धोंडीबा बोरगावे , मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते , परमेश्वर डांगे , शादुल शेख , दिगंबर डांगे , उमर शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *