कंधार ; प्रतिनिधी
सध्या आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे वाहत आहेत.या दिवसात चिमुकले मृग नक्षत्रा आधी मौज-मजा म्हणून वाऱ्यावर भिंगऱ्या फिरविण्यात रस असतो.सध्या कोरोना महासंकटात चिमुकले शाळा व परीक्षा बंद असल्यामुळे घरात लाॅकडाउन आहेत. कंधार येथे सायंकाळी शिवाजीनगरात ही बच्चे कंपनी वाळूवर खेळते.
आज महाराष्ट्राभर भगव्याध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवप्रभुंना वंदन करत असतांना आमचे शिवाजीनगर मागे कसे राहणार?म्हणून एक अनोखा उपक्रम राबवत ऐतिहासिक राज्यारोहणाचा आनंद या पध्दतीने नगरतील चिमुकल्यांनी साजरा केला.महाराष्ट्रातीलच काय विश्वातील तमाम शिवप्रेमींच्या दृष्टीने गौरवशाली दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय!
कंधार शहरातील शिवाजीनगर येथे छत्रपती शिवप्रभुंच्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्यानेच बच्चे कंपनीसाठी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या वतीने टाकाऊ 4×6 फोटो पासून अलंकारिक 40 भिगऱ्या हस्तकलेतून तयार करुन, चिमुकल्यांना या दैदीप्यमान दिनी खेळण्यातून आनंद व्दिगुणीत करतांना लाख मोलाचे समाधान मिळते.अशा विविध उपक्रमातून सुंदर अक्षर कार्यशाळेची कल्पकता सर्वांना परिचित आहे.
