लोहा( प्रतिनिधी) तालुक्यातील कापसी (बु) येथील ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी( बु) येथे नवीन घेतलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण काल रविवारी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
, यावेळी ₹आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे ,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर ,सभापती संजय बेळगे, माजी महापौर किशोर स्वामी, माजी नगरसेवक विजय येवनकर,माधवराव पांडागळे,शंकर पाटील, सरपंच सोपान जाधव, राजू पाटील कापसीकर, प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की ग्रामपंचायतीच्या निधीतून कापसी( बु) ग्रामपंचायतीने नवीन रुग्णवाहिका खरेदी करून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा लवकर मिळविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. कापसी( बु) ग्रामपंचायतीने स्वतःच्या निधीतून रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका खरेदी करून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे, कापसी( बु) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकामासाठी भरीव निधी मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून लोहा व कंधार तालुक्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.लोहा-कंधार मतदारसंघात दर्जेदार आरोग्य सुविधा सह शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा ,वीज व शेती रोजगार, शेती विकास व तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी येणाऱ्या काळात भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी सरपंच ललिता ताई आळणे, राजू पा. वडवळे,संतोष पा.वडवळे,हौसाजी कांबळे, उत्तम पाटील,गणेश पाटील, केशव पाटील, भीमराव कांबळे,गोविंदराव जहागीरदार, माधव ढवळे सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
