शहरात वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाओ आंदोलन

नांदेड‌- गंगाधर ढवळे


 केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहरात वर्कशाॅप येथे  डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. 

             राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना सांगितले होते. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी घोषणा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी  केली होती. 
        नांदेडसह राज्यातील एस टी बससेवा व सर्व महानगरातील वाहतूक सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज वर्कशाॅप येथे विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डफली वाजवून लक्ष वेधले. तसेच विभागीय नियंत्रकांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचेही नांदेड जिल्हा व शहर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *