नांदेड जिल्हा Crime update ; जिल्हातील crime बातम्या चा आढावा

१) जबरी चोरी :Forced theft

) विमानतळ :- दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे १८.३८ वा. चे सुमारास, तानाजीनगर नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, फिर्यादीचे एक शेळीचे बकरे किंमती ७,०००/-रुपयाचे अॅटो मध्ये घेवुन जात असताना फिर्यादी यांनी नमुद आरोपीतांना अडविण्याचा प्रयत्न केला असता नमुद आरोपीतांनी फिर्यादीला हाट बाजु नही तो तेरेको गोलीसे उड़ा दूंगा असे म्हणुन जबरीने चोरुन नेले. वगैरे फिर्यादी बजरंगसिंह अर्जुनसिंह ठाकुर, वय २५ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. तानाजीनगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे विमानतळ गुरनं १५८/२०२१ कलम ३९२, ३४ भादंवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / श्री जाधव, मो.क्रं. ९७६५९०२७१० हे करीत आहेत.


२) नांदेड ग्रामीण :- दिनांक ०६.०६.२०२१ रोजी चे १७.४५ वा. चे सुमारास, दुध डेअरी ते ढवळे कॉर्नर जाणारे रोडवर मारोती मंदीर ते मच्छी मार्केट नांदेड येथे, यातील फिर्यादी हा त्याचे वाजेगावचे ज्वेलर्सची दुकान बंद करुन, दागिने ठेवलेली बॅग गळयात अडकावुन वाजेगाव येथुन दुध डेअरी मार्ग ढवळे कॉर्नकडे जात असताना, फिर्यादी हा दुध डेअरी ते ढवळे कॉर्नर जाणारे रोडवर मारोती मंदीर ते मच्छी मार्केट व हनुमान मंदीर चे दरम्यान फिर्यादी आला असता, त्याचे पाठीमागुन तीन अनोळखी मुले वय अंदाजे २० ते ३० वयोगटातील फिर्यादीचे मोसा समोर येवुन फिर्यादीस रस्त्यात थांबवुन फिर्यादी जवळील ३०,०००/- रुपयाची बॅग जबरीने हिसकावुन घेवन जाण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीचे दोन्ही हातावर व पोटावर तलवारीने मारुन जखमी केले. वगैरे फिर्यादी सतीश बालाजी डहाळे, वय ४१ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. एन डी ४ रामनगर सिडको नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं ३४९/२०२१ कलम ३९४, ३४१, ५११ भादंवि सह कलम ४ तपास पोउपनि/ श्री होळकर, मो.क्रं. ९४२००९६३३० हे करीत आहेत. / २७ भाहका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल


२) घरफोडी :

बिलोली :- दिनांक ०६.०६.२०२१ रोजी चे ०२.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचे घरी साठेचौक बिलोली ता. बिलोली जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे घरात कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करुन, सोन्याचे नेकलेस किंमती ४४,०००/- मंगळसूत्र किंमती ११,०००/- रुपयाचे व रोख रक्कम किंमती २५,०००/- रुपये असा एकुण ८१,०००/- रुपयाचे, दोन रुपयाचा ऐवज चोरुन नेला. वगैरे फिर्यादी लालु राजु आरसे, वय २६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. साठेचौक बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे बिलोली गुरनं १११ / २०२१ कलम ४५७, ३८०, भादंवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन, तपास पोउपनि सय्यद, मो.क्रं. ९९२३७००६८९ हे करीत आहेत.


३) मो. सा. चोरी :

नांदेड ग्रामीण : दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे २३.०० ते दिनांक ०६.०६.२०२१ चे ०६.०० वा. चे दरम्यान, आंबेडकरवादी मिशन जवळ सिडको नांदेड येथे, यातील फिर्यादीची होंडा शाईन कंपणीची मो सा क्रमांक एमएच २६/बीएम/ १२८१ रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. वगैरे फिर्यादी सुधाकर जळबा गायकवाड, वय ३७ वर्षे, किंमती ३०,०००/- व्यवसाय नोकरी, रा. आंबेडकरवादी मिशन जवळ सिडको नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं ३४७/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना २२५५ कवठेकर, मो क्रं ०२४६२-२२६३७३ हे करीत आहेत.

वजीराबाद :- दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे १९.०० ते १९.१५ वा.चे दरम्यान, रेल्वे स्टेशन गेट जवळ नांदेड येथे, यातील फिर्यादीची होंडा शाईन कंपणीची मो सा क्रमांक एमएच २६ / बीएच / ९१७८ किंमती ३५,०००/- रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. वगैरे फिर्यादी प्रदीप रामसेवक गौतम, वय २५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. भावसार चौक नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे वजीराबाद गुरनं १६७/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि/भद्रे, मो क्रं ९८२३३०८०६३ हे करीत आहेत.


मोबाईल चोरी mobile theft

वजीराबाद :- दिनांक ०६.०६.२०२१ रोजी चे ०४.३० ते ०५.१५ वा. चे दरम्यान, विठाई हॉस्पीटल नांदेड येथे, यातील फिर्यादीचा लुनार सिल्वर कंपणीचा मोबाईल किंमती ३५,०००/- रुपयाचा विठाई हॉस्पीटल मध्ये टेबलावर ठेवला असता, सदर मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला. वगैरे फिर्यादी मुक्तेश्वर अशोक काटकर, वय २५ वर्षे, व्यवसाय डॉक्टर, रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट श्रीनगर नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे वजीराबाद गुरनं १६६/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/ १७०१ वाघमारे, मो क्रं ९५५२५५६३५८ हे करीत आहेत.

५) चोरी:

शिवाजीनगर :- दिनांक ०६.०६.२०२१ रोजी चे ०३.०० ते ०६.०० वा. चे दरम्यान, संजीवणी हॉस्पीटल जनरल वार्ड नांदेड

येथे, यातील फिर्यादीने संजीवणी हॉस्पीटल येथे जनरल वार्ड मध्ये स्वताच्या बॅगमध्ये ठेवलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमती

१५,०००/-

रुपयाचा व नगदी २००० /- रुपये असा एकुण १७,०००/-

रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. वगैरे फिर्यादी

वैशाली विश्वनाथ पाईकराव, वय २७ वर्षे, व्यवसाय नर्स, रा. हदगाव नागसेननगर ह. मु राज कार्नर हरीभाऊ डांगे रोड

उल्हासनगर तरोडा नाका नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे शिवाजीनगर गुरनं २०९/२०२१ कलम ३७९ भादवी कायदा

प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/ २१२१ पांचाळ, मो.नं. ९०११०७९५५६ हे करीत आहेत.


६) गंभीर दुखापत :

१) देगलुर :- दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे १६.३० ते १७.०० वा. चे दरम्यान, राठौर पेट्रोलपंप देगलुर ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीस मोसाचा धक्का लागल्याचे कारणावरुन, फिर्यादीस शिवीगाळ करुन, थापडा बुक्याने व लाथाबुक्याने मारहाण करुन हातात दगड घेवुन फिर्यादीचे भावाचे डोक्यात मारुन डोके फोडुन दुखापत करुन जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी प्रशांत प्रकाशराव गवलवाड, वय २३ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. मांगरादेगाव रोड देगलुर ता. देगलुर जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे देगलुर गुरनं २५१/२०२१ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/ २१२५ जोगने, मो.क्र. ९५५२५२०३६३ हे करीत आहेत.

२) नांदेड ग्रामीण : दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे ११.३० वा. चे सुमारास, गाडेगाव शिवारात फिर्यादीचे राहते घरी नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन हातात काठी, लोखंडी रॉड, लोखंडी गजाळी घेवुन विहीरीचे बाजुस असलेल्या जागेच्या कारणावरुन फिर्यादीस व साक्षीदार यांना डोक्यात, हातावर, पायावर मारहाण करुन दुखापत केली व शिवीगाळ करुन, जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी संभाजी पांडुजी उबाळे, वय ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. गाडेगाव ता. जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं ३४६/२०२१ कलम ३३४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/ श्री खैरे, मो.क्र. ०२४६२-२३६३७३ हे करीत आहेत.

३) इतवारा :- दिनांक ०५.०६.२०२१ रोजी चे २१.३० ते २२.०० वा. चे दरम्यान, पिवळी बिल्डींगचे दुकान समोर पायन्यावर नांदेड येथे, यातील फिर्यादी हे मित्रा सोबत मोबाईलवर पबजीचा गेम खेळत बसले असता, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, फिर्यादीस येथे का बसले म्हणुन शिवीगाळ करु लागले तेव्हा फिर्यादीने शिव्या देवु नका असे म्हणल्याने नमुद आरोपीतांनी थापडाबुक्याने मारहाण करुन आरोपी नं १ याने त्याचे हातातील लोखंडी फायटरने तोंडावर मारुन फिर्यादीचे तीन दात पाडुन गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी आयानखान पि. अकबरखान पठाण, वय १७ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. बैलमार्केट इतवारा पैलवान टी हाऊस जवळ नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे इतवारा गुरनं ११५/२०२१ कलम ३३५, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/ श्री घोटके, मो.क्र. ९९४६६६३३५५ हे करीत आहेत.


७) फसवणुक :

हिमायतनगर :- दिनांक ०९.०४.२०२१ रोजी चे १०.३० वा. चे सुमारास, मो. जवळगाव हिमायतनगर ता. हिमायतनगर जि.

नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, शेतकऱ्याचे मालहळद तुर, कापुस, हरभरा इत्यादी पीक आडत दुकानात खरेदी करुन, यातील फिर्यादीचा २३ क्विंटल हरभरा किंमती १,१६,३५०/- रुपयाचा माल झाला त्यापैकी १६,०००/- रुपये दिले व एक लाख रुपये एक महिण्याच्या अंतराने देतो असे तोंडी सांगुण घेतलेल्या मालाच्या बनावट पावत्या बनवुन नमुद दोन आरोपीतांनी विश्वासघात करुन फिर्यादीची फसवणुक केली. वगैरे फिर्यादी दिगांबर संभाजी निर्मले, व ४५ वर्षे, रा. जवळगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हिमायतनगर गुरन. १२४ / २०२१ कलम ४२०, ३४ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/ श्री देवकते मो.क्र. ८९७५७६१२३२ हे करीत आहेत.


८) अपघात:

१) नांदेड ग्रामीण :- दिनांक ०६.०६.२०२१ रोजी चे ११.४५ वा. चे सुमारास, दुध डेअरी चौक वसरणी ता. जि. नांदेड येथे,

यातील मयत नामे शेख शोहेब पि. शेख कलीम, वय १५ वर्ष, व्यवसाय शिक्षण, रा. रहीमपुर वसरणी नांदेड यातील मयत व त्याचा मित्र हे मोसा क्रं एम एच २६ एडब्लु ८७८२ वर बसुन ढवळे कॉर्नर सिडको नांदेड ते नावघाट ब्रीजकडे जात असताना, दुध डेअरी चौक वसरणी येथे यातील नमुद आरोपीने आपले ताब्यातील ट्रक क्रं एम एच १४ एचयु १४६२ च्या चालकाने त्याचे ताब्यातील टूक हयगय निष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवून, यातील नमुद मोसा ला जोराची धडक दिल्याने मयताचे डोक्याचे उजवे बाजुस, उजवे गालाचे खाली, उजव्या खुब्यावर दंडाला पाठीवर कमरेपर्यंत गंभीर दुखापत होवुन सदर ट्रक चालक हा मयताचे मरणास कारणीभूत झाला आहे. वगैरे वरुन फिर्यादी शेख जावेद शेख इसाक, वय ३८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. रहीमपुर वसरणी ता. जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन ३४८/ २०२१ कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि श्री थोरात, मो.नं. ०२४६२-२२६३७३ हे करीत आहेत.

२) हदगाव :- दिनांक ०२.०६.२०२१ रोजी चे १२.०० वा. चे सुमारास, हदगाव उमरखेड रोडवर बालाजी मंदीर समोर हदगाव शिवारात ता. हदगाव जि. नांदेड येथे, यातील मयत नामे शुभम साहेबराव कदम, वय २४ वर्ष, रा. कारखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यातील मयत हा मोसा क्रं एम एच २९ बीके-९३३७ वर बसुन श्रीनिवास पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकुण परत येत असताना, त्याचे ताब्यातील मोसा ही हयगय निष्काळजीपणाने व भरधाव वेगात चालवीत असताना, त्याचे समोरील वाहणास ओव्हरटेक करीत असताना, वहाणाचा धक्का लागल्याने तो रोडवर पडुन गंभीर जखमी झाला व मरणास स्वतः हा कारणीभूत झाला आहे. वगैरे वरुन फिर्यादी विजय साहेबराव कदम, वय २७ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कारखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांनी दिलेल्या फियांदवरुन पोस्टे हदगाव गुरन १३५/२०२१ कलम ३०४ (अ), २७९, भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि/ श्री सावंत, मो.नं. ९९२३६९२४०२ हे करीत आहेत.


९) विषारी औषध पिऊन आकस्मात मृत्यु :Accidental death due to poisoning

१) देगलुर : दिनांक ०६.०६. २०२१ रोजी चे ०८.३० वा. चे सुमारास, मयताचे शेतात सुगाव शिवार ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे मारोती नागोराव कावळगडे, वय ४६ वर्षे, रा. सुगाव ता. देगलुर जि. नांदेड यांने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून, कोणतेतरी विषारी औषध पिवुन मरण पावला. वगैरे खबर देणार अनसुयाबाई भ. मारोती कावळगडे, वय ४० वर्षे, व्यवसाय घरकाम रा. सुगाव ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुनल पोस्टे देगलुर आ.मृ. २३ सिआरपीसी प्रमाणे आ.मृ. दाखल असुन तपास पोना / ८३२ काळे, मो.क्र. ९८६००२६६५२ हे करीत आहेत. / २०२१ कलम १७४


१०) गळफास घेऊन आत्महत्या:Suicide by strangulation

भाग्यनगर :- दिनांक ०६.०६.२०२१ रोजी ०७.०० वा. चे सुमारास, झेंडा चौकाचे समोर शिवाजी चौक पाटी जवळ नांदेड येथे, यातील मयत नामे अतुल दत्ता धुळे, वय ३५ वर्षे, रा. विदुळ ता. उमरखेड जि. यवतमाळ हा कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन गळफास घेवुन आत्महत्या केली. बगैरे खबर देणार अनिल खंडु पातोडे, वय २१ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. सांगवी नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्ट भाग्यनगर आ. मृ. २७/ २०२१ कलम १७४ सिआरपीसी प्रमाणे आ. मृ. दाखल असून तपास पोहेकॉ/२०१४ सिरसाट, मो.क्र. ९४२३३०६२४५ हे करीत आहेत.

जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *