कंधार येथे केंद्र सरकारचा पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कॉग्रेसचे जन आंदोलन

कंधार ; प्रतिनिधी

आज दि 07-06-21 रोजी विश्वनाथ पेट्रोल पंप कंधार येथे पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जन आंदोलन कंधार तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व सोशल मीडिया ता
तालुका काँग्रेस च्या वत्तीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलना दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल टाळण्यासाठी आलेल्या जनसामन्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या या जनसामन्यांच्या लोकांच्या तिव्र नाराजीच्या प्रतिक्रिया जाणवल्या.

या आंदोलनात केंद्रे सरकारच्या विरोधात निदर्शनासह निषेध करत “मोदी हटाव देश बचाओ” चे नारे देत आंदोलन करण्यात आले.

यानंतर मा. तहसीलदार साहेब कंधार यांच्या मार्फत मा. महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी कंधार काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे साहेब, अॅड बाबुराव पुलकुंडवार , संजय भोसीकर, बाबुराव पा गिरे, शहाजी राजे नळगे, हमीद म. सुलेमान, मन्नान भाई चौधरी, बाळासाहेब पवार, सतीश नळगे, सतीश देवकत्‍ते, दत्ता पाटील घोरबांड, अजय मोरे, स्वप्नील परोडवाड, ऋषीकेश बसवंते, अजिंक्य पांडागळे, अमिन शहा, अशोक पाटील, दिलीप पवार, सुरेश भागानगरे, आनंद भागानगरेसह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून तिव्र निषेध करत आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *