आडगाव च्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध :आमदार श्यामसुंदर शिंदे

आडगाव येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते सी.सी.रोड चे भूमिपूजन

लोहा(,प्रतिनिधी )

लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील आडगाव येथे सी.सी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील,लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार,शेकाप जिल्हाध्यक्ष योगेश पा. नंदनवनकर प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी उपस्थित गावकऱ्यांशी सवांद साधताना म्हणाले की,आडगाव या गावाने मला भरपूर प्रेम दिले आहे आणि मी आडगाव च्या सर्वांगीण विकासकामाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीन आणि आडगाव चा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो वा गावच्या मूलभूत विकासकामांचा विषय प्रधान्यने सोडवण्यासाठी कटीबद्ध असून माझे आडगाव गावावर विशेष लक्ष राहील असे आ.शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले, यावेळी सरपंच सुवर्णा मंगेश क्षीरसागर , माजी सरपंच बालाजी क्षीरसागर,सचिन पा. क्षीरसागर,सुधाकर सातपुते,मंगेश पा. क्षीरसागर,बालाजी पा.घनश्याम , (उपसरपंच ) विश्ववाबंर पाटील क्षीरसागर, (पोलीस पाटील)गणेशआबा पा.क्षीरसागर , शहाजी पा. जगन्नाथ पा. रोहिदास पाटील क्षीरसागर, प्रभू पा. क्षीरसागर संजय धनसडे, डी सी धनसडे, चंद्रकांत धनसडे, विष्णू धनसडे,सिद्धू पा.वडजे,शेषेराव पाटील,प्रसाद जाधव,अशोक सोनकांबळे, किरण क्षिरसागर,बालाजी वरपडे,ईश्वर पा.,राहुल पा काळेश्वर बोमनाळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *