कंधार ; प्रतिनिधी
तालुक्यातील गऊळ येथिल शंभु महादेव परिसर सुशोभीकरण व सभामंडपाचे सोमवार दि.७ जुन रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा हस्ते उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.
माजी जिल्हा परीषद सदस्य बाबुराव पाटील गिरे यांनी दांडचा शंभु महादेव परिसरात सुशोभीकरणासाठी विकास निधी द्यावा म्हणून आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. तात्काळ त्या मागणीची दखल
लोहा-कंधार चे लोकप्रिय आमदार मा शामसुंदरजी शिंदे यांनी घेऊन सुशोभीकर निधी म्हणून सुमारे 5 लक्ष रू देऊन त्या कामाचे उद्घाटन ही आज दि.७ जुन रोजी केले.तसेच 2515 अंतर्गत सभामंडपासाठी 10 लक्ष रू निधी दिला.
या उदघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून
सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शामसुंदर शिंदे, मा. जि. प .सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रावसाहेब पा. शिंदे, शेकाप युवक जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर, शेख शेरूभाई, फुलवळ चे माजी सरपंच बालाजी देवकांबळे, प्रविण मंगनाळे, भानुदास गोमारे, बालाजी चिवडे,कोंडीबा मोरे आदीची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.