मोटार कार पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड :-

, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने मोटार कार या संवर्गासाठी MH26-BX ही नवीन मालिका 9 जून पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ईमेलसह 9 जून 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यत करावेत. त्यानंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन तथा नोंदणी प्राधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तसेच या क्रमांकाचा जाहीर लिलाव 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे यांची सर्वांनी नोंद घ्यावी असेही, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *