कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील बाचोटी येथिल भुमिपुत्र सुनिल पाटील हराळे यांची नुकतीच शिव महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड झाली .त्याबद्दल आज मंगळवार दि.८ जुन रोजी बाचोटी येथे भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भोई समाजाच्या वतीने आयोजक मन्याड खोऱ्यातील चेअरमन पप्पू श्रीराम डुबुकवाड यांचा वतीने व भोईसमाजा वतीने दि.८ जुन रोजी सदर सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सत्कार केल्याबद्दल भविष्यात उद्भवणारे भोई समाजाच्या विविध प्रश्नाची सोडवणूक शिव महासंग्राम संघटनेच्या वतीने करण्याचे आश्वासन यावेळी सुनिल हराळे यांनी दिली. बाचोटी येथिल भोईसमाजाचे आभार मानले.