कंधार ; प्रतिनिधी
कंधार ,बहादरपुरा,मानसपुरी कुरुळा पेठवडज,येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये केवळ दिव्यांगाना विशेष मोहीम राबवण्यात आली. पहीली लस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज दि.8 जुन रोजी संपन्न झालेल्या या कॅम्पला कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कैलास बळवंत, कंधार तालुक्याचे आरोग्य अधिकारी ढवळे , बहादरपुरा नगरीचे उपसरपंच हनुमंत पाटील पेठकर, ग्राम परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख सचिन तानाजी पाटील पेटकर , ग्रामपंचायत सदस्य बालाजी तोटवाड,शेख शादुल, शेख इस्माईल , सर्व आशा वर्कर व सर्व आरोग्य कर्मचारी बहादरपुरा ग्रामपंचायत चे सेवक शेख सुलतान कारकून रवी कदम, विकी कुरुडे, इत्यादी कॅम्पमध्ये उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांनी सर्वांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेऊन लस घ्यावी आणि कोरोना पासून आपला बचाव करावा असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक शेख दस्तगीर यांनी केले आहे.