कंधार ; प्रतिनिधी
लोहा/कंधार मतदार संघात लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे स्मारक व्हावे अशी येथील सर्व जनतेची अपेक्षा व मागणी आहे त्यामुळे कंधार शहरात शासनाची मोकळी जागा असुन त्या जागेवर गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मारकासाठी उपलब्ध करुन देवुन त्या ठिकाणी कै. गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्मारक उभारावे अशी मागणी दि.८ जुन रोजी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या स्मारकामुळे कंधार लोहा मतदार संघातील तरुण पिढीला लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कार्याची व जनतेच्या हितासाठी त्यांनी आपले भविष्य पणाला लावले. त्यांची गोर-गरीब, कष्टकरी, ऊस तोड कामगार, दीन-दलीत आदि लोकांसाठी त्याचे योगदान हे मोठे प्रमाणात होते. त्यांनी आपल्या पुर्ण हयातीत या सर्व लोकांसाठी काम केले ते आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असुन त्याच्या स्मारकामुळे येथील तरुण पिढीला स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आठवणी स्मरणात राहतील. व त्यांना त्याच्या आठवणीमुळे एक दिशा देण्याचे काम हे स्मारक सदैव करील.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे स्मारका विषयी गांभीर्याने
घेऊन कंधार येथे स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दयावी. अशी मागणी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दि.८ जुन रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाच्या प्रती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात ,सामाजिक न्यायमंत्री
धनजंय मुंडे ,पालकमंत्री नांदेड
अशोकरावजी चव्हाण ,विधानसभा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणविस ,माजी मंत्री पंकजाताई पालवे/मुंडे,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,लातुर लोकसभा मतदार संघ खासदार सुधाकरराव श्रंगारे,बिड लोकसभा मतदार संघ खा. प्रितमताई मुंडे,लोहा/कंधार विधानसभा मतदार संघ आमदार श्यामसुंदर शिंदे आदींना देण्यात आले आहे.
