एप्रिल महिन्यात कोरोना झाल्यानंतर ब्लॅक फंगल आणि अन्य आजारांनी खूप बेजार केलं होत. पण आपला आशीर्वाद, सहकार्य, सदिच्छा या बळावर ठीक होत आहे. दोन महिन्यांनी आज आकाशवाणीत नोकरी करण्यासाठी आलो.
पण समाजाचं काही देणं बाकी असावं म्हणून मी कोरोनातून बरा झालो. अर्थात हे श्रेय माझे डॉकटर मित्र सचिन सरोदे आणि आपण सर्व हितचिंतक यांना जाते. …
आयुष्याच्या अनेक वळणांवर आपण भेटणारच आहोत. फक्त स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घ्या. कोरोना मुक्त रहा हीच सदिच्छा.