शिवभोजन थाळीचा कंधार तालुक्यातील गरजूनी लाभ घ्यावा – सौ.आशाताई शिंदे…!… ;कंधार येथे बसस्टँट जवळ शासनमान्य शिवभोजन थाळीचा शुभारंभ

कंधार ; प्रतिनिधी

आघाडी शासनाने मुखमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पुढाकार घेवून गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी उपक्रम राज्यात राबविला आहे.कंधार शहरात आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रयत्न करुन दोन शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाली असून कंधार तालुक्यातील गोरगरीब ,गरजु नागरीकांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यक्रत्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांने कंधार येथे केले.

बुधवार दि 09 जुन -2021 रोजी कंधार येथे बसस्टँण्ड जवळ “शिवभोजन थाळी” चा शुभारंभ करण्यात आले. शिवभोजन थाळी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शामसुंदर शिंदे होत्या त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून तहसीलदार व्यंकटेश मुंढे,कंधार तालुका कॉग्रेस तालुका अध्यक्ष बालाजी माधवराव पांडागळे,नगरसेवक शहाजी राजे नळगे, नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा शिंदे, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे ,शिवसैनिक माजी नगरसेवक गणेश कुंटेवार,नगरसेवक विनोद पापीणवार, दत्तात्रय पा घोरबांड,माजि सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड, योगेश पा नंदनवनकर यांची व्यासपिठावर उपस्तिती होती.
यावेळी बालाजी पांडागळे यांनी मनोगतातून शिवभोजन सुरु करणाऱ्या रुषीकेश बसवंते व आभिजित हाळदेकर यांना शुभेच्छा दिल्या.तर पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी सदर शिवभोजन थाळीचा खरोखर जे गरजवंत आहेत त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहान करुन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार येथिल ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन गृह उभारावे अशी विनंती यावेळी आशाताई शिंदे यांच्या माध्यमातुन केली.

असिफ शेख, माधव गित्ते, अगंद केंद्रे, राजकुमार केकाटे, मंडळाधिकारी शेख साहेब, बाळासाहेब पवार, सतीश नळगे, अजय मोरे, शहाजी पा शिंदे, प्रा कळकेकर, नितीन कोकाटे, राजश्री ताई तेलंग, नितीन राजुरकर , अशोक गुट्टे, मिलिंद गोधणे, स्वप्नील परोडवाड, अजिंक्य पांडागळे, अवधूत पेठकर, मदन कल्याणपाड, संतोष कागणे, शंकर केंद्रे, सरपंच तोरणे पाटील इतर कार्यकर्त्यासह पञकार बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत कांबळे-हळदेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश देवकते यांनी केले आणि आभार मारोती मामा गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *