लोह्यात गॅसचा स्फोट, लाखोंचे नुकसान ; सुदैवाने जिवीत हानी टळली

लोहा/श.प्र.शिवराज दाढेल लोहेकर.

लोहा शहरातील जुना लोहा भागातील प्रभाग क्रमांक ८ वार्ड क्रमांक १५ मधील बडेसाब अहमदसाब भातनासे यांच्या घरी सकाळी ७.३५ वाजता अचानक गॅस शेगडीच्या पाईपने पेट घेतला व पुढे ती आग सिलिंडर पर्यंत जावून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात सुदैवाने मनुष्य हानी टळली परंतु लाखो रूपयांचे नुकसान होवून कुटूंब उघड्यावर पडले.सदरिल घटनेतील स्फोटाने घरातील सर्व घरावरील पत्रे,अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य,जिवनावश्यक वस्तू, महत्वाची कागदपत्रे,रोकड २० हजार सह लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.सदरिल घटनेत सुदैवाने मनुष्य हानी टळली असली तरी लाखो रूपयांचे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर पडल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सदरील घटनेची माहिती मिळताच लोहा कंधार चे माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रोहिदासजी चव्हाण, नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,

माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक केशवराव मुकदम,गटनेते तथा नगरसेवक करीम शेख,नगरसेवक संभाजी चव्हाण, श्याम अण्णा नगरसेवक नारायण येलरवाड.गॅस एजंसी.चे.वैजनात भोसिकर. पवार,नगरसेवक नबी शेख यांनी घटना स्थळी पाहणी करून सदरिल घटनेची माहिती प्रशासनाला दिली व नुकसान ग्रस्तांना मदतीची मागणी केली.घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी लोहा कंधारचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर,लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर,लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे सह मंडळाधिकारी भोसीकर, तलाठी तांबरे घटना स्थळी दाखल झाले व प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. व तसेच
अनेकांनी पुढे केला मदतीचा हात.


◾️ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ ऊर्फ बापू चव्हाण यांची तात्काळ मदतीचा हात

जिल्हा नियोजन समिती नांदेडचे सदस्य तथा लोहा पंचायत समिती सदस्य नवनाथ ( बापू ) रोहिदासजी चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन सदरिल कुटुंबीयांना मदत म्हणून अत्यावश्यक साहित्य कपडे, सर्व संसार उपयोगी वस्तू देवून आपले कर्तव्य पार पाडून कुटुंबीयांना आधार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *