विलास मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण

नांदेड – लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव विलास मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विलास मोरे हे सोनखेड ग्रामपंचायतचे सदस्य असून वाढदिवसाचे औचित्य साधून राजयोगी हिराजी महाराज संस्थान मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पुरण महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान पंचायत सदस्य श्रीनिवास मोरे,राष्ट्रवादी ग्रंथालय काँग्रेस चे अंकुश पाटील शिखरे सोंबत मधुकर येवले, कैलास मोरे, हरिभाऊ मोरे, शंभरगावचे सरपंच गौतम बनसोडे, अमोल खिल्लारे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय सोनखेड च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित सोनखेड नगरीचे सरपंच अच्युत मोरे, उपसरपंच प्रवीण मोरे, ग्रामसेवक नावंडे साहेब, त्यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मोरे, कृष्णा मोरे, सुरेश मोरे, तुकाराम खिल्लारे व सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.‌ लोहा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फ़ळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील सर्व अधिकारी, सोबत युवक काँग्रेसचे सुदर्शन शेबळे, ग्रामपंचायत सदस्य अजीम पटेल, अमोल खिल्लारे, साईनाथ गुंडले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *