पिक विम्यासाठी प्रहारचे उपोषण
लोहा प्रतिनिधी :- शैलेश ढेबंरे
खरीप हंगाम सप्टेंबर 2020 रोजी मोठ्या प्रमाणात लोहा तालुक्यात अतिवृष्टी होऊन येथील शेतकऱ्याचे खुप मोठे नुकसान झाले परंतु येथील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरला होता परंतु शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 72 तासात नुकसान झाल्याची तक्रार करा अशा सूचना केल्या होत्या पन सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशा तक्रारी करणे शक्य नसल्याने तसेच पिक विमा कंपनीचा नवीन सुचना कोणतेही शेतकर्याला माहीत नसल्याने संपूर्ण शेतकरी तक्रार करु शकले नाहीत त्यामुळे पिक विमा कंपनीने लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पासून वंचीत ठेवले आहे या उलट जा बोटावर मोजण्याइतके शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या यांना पिक विमा मिळालेला आहे खरा प्रश्न असा सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार करणे दाखल करणे शक्य आहे का असे मत उपोषण करते प्रहार तालुका उपाध्यक्ष गोविंद वडजे यांनी व्यक्त केले मी दि १०; ०६; २०२१ वार गुरूवार पासुन माझ गाव शेलगाव येथील हनुमान मंदिरामध्ये आमरण उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही हालतीत मी माझी उपोषण सोडणार नाही मागील वेळेस मी रायवाडी येथील नंदिकेश्वर मंदिर येथे उपोषणाला बसलो होतो कोरोना चे कारण सांगून माझ्या उपोषणाला मी प्रशासनाला सहकार्य म्हणून माझे उपोषण काही काळासाठी स्थगित केले होते पण आता नाही
पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल केलेल्या आहेत याचा पाठपुरावा कृषी विभागाकडून केला गेला नाही म्हणून जोपर्यंत पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच राहणार
गोविंद वडजे
(प्रहार जनशक्ती तालुका उपाध्यक्ष लोहा)