कंधार ; प्रतिनिधी
यावेळी कंधार नगरपरिषद चे माजी उपनगरअध्यक्ष
सुधाकर आण्णा कांबळे यांच्या हस्ते दृष्टीदान दिना कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नेत्र चिकित्सक अधिकारी करपे यांनी
रुग्णांना तपासणी करुन औषध उपचार देण्यात आला तसेच चष्म्याचे नंबर काढुन काही जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी डोळ्याचे महत्त्व काळजी यावार मार्गदर्शन करण्यात आले.
जसे की आयुष्याच्या पलीकडे जाऊन ही जिवंत राहावे…..
अनंतात विलीन होऊनही आपल्या डोळ्यांनी आपल्यांना मन भरून पाहावे ……..!
नेत्रदान हे मरोणोतर करता येते.
मृत्यूनंतर 4 ते 6 तासात नेत्रदात्याचे डोळे काढले गेले पाहिजेत.
डोळे काढल्याने मृत व्यक्तीचा चेहरा विद्रुप होत नाही.
नेत्र दात्याची तसेच नेत्र प्राप्ती रुग्णांची ओळख गुप्त ठेवण्यात येते.
रजिस्टर्ड डॉक्टरच नेत्रदात्याचे नेत्र काढते.
नेत्र दान हे सर्व श्रेष्ठ दान.