लोहा ; प्रतिनिधी
जुना लोहा ,तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे दि.१० जुन रोजी झालेल्या गॅस स्फोटात खुरेशी परिवाराला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने भाजपा महाराष्ट्र महिलाआघाडी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सौ प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला .तसेच त्या कुटुंबांना काहिही कमी पडू देणार नाही असे आश्वस्त केलं.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार , नगरसेवक दत्ता भाऊ वाले ,नामदेव पाटील पवार ,नगरसेवक भास्कर पाटील पवार माजी नगरसेवक आप्पाराव पाटील, बंडू पवार ,इमाम लदाफ ,युनुस शेख पटेल शेख , रमजान कुरेशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते