उस्माननगर ता.कंधार येथिल आरोग्य केंद्रात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते अँम्बुलन्सचे लोकार्पण

कंधार ; प्रतिनिधी

आज शुक्रवार दि.११ जुन रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर ता.कंधार येथे अँम्बुलन्स चे उद्घाटन लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यास्ते झाले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे,प.स.सभापती लक्ष्मीबाई घोरबांड, कंधार तालुका कॉग्रेस तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे,डॉ. श्याम सावंत,सरपंच उस्मान नगर गयाबाई घोरबांड, उस्मान नगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक भूष्णुर यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे बोलताना म्हणाले की,लोहा कंधार मतदारसंघात उत्तम दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी त्या उद्देशाने मी शासन दरबारी सतत पाठपुरावा करत असतो आणि यापुढे पण करणार तसेच उस्मान नगर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी मी आग्रही आहे आणि याचा पाठपुरावा चालू असल्याची उपस्थिती होती. याप्रसंगी शेकाप जिल्हाध्यक्ष योगेश पा. नंदनवनकर,सरपंच दहिकळंबा अवधूत शिंदे,सरपंच भुत्याची वाडी माधवराव भुत्ते, उपसरपंच भुत्याची वाडी हणमंत हालकुंडे,दत्तात्रय घोरबांड, अशोकराव काळंम,कमलाकर शिंदे,गोविंद पोटजाळे, ग्रामसेवक शिंदे, दवाखान्यातील कर्मचारी,डॉक्टर व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *