कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथून जवळच आसलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेत आज शुक्रवार दि.११ जुन रोजी साप असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येतात तात्काळ त्यांनी सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांना संपर्क साधला असता त्यांनी मोठ्या सिताफीने धामण जातीच्या सापास पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून जिवदान दिले आहे.
आज शुक्रवार दि.११ जुन रोजी साप असल्याचे कर्मचारी यांना लक्षात येताच निदेशक शिलेदार व पारवेकर यांनी तात्काळ सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांना संपर्क साधला व साप असल्याची माहीती दिली.आवश्यक ती माहीती विचारणा करुन सदरील सापाजवळ कोणत्याही व्यक्तीला जाऊ न देता पाळत ठेवण्याच्या सुचना दिल्या.
तात्काळ सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी व सुहास वाघमारे यांनी आयटीआय येथे भेट देवून आपल्या कौशल्याने सापास पकडले व सदर साप हा धामण जातीचा असल्याची माहीती दिली.यावेळी आयटीआयचे कर्मचारी निदेशक डी.बी.गडपल्लेवार,निदेशक आर.एम.राखे,निदेशक यवते,जयस्वाल,कनिष्ठ लिपीक खुरपे आदीची यावेळी उपस्थिती होती.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बिळामध्ये पाणी जावुन बिळातून साप बाहेर पडत आहेत. साप हा यक्ष शितरक्ती प्राणी असल्यामुळे त्याला जास्त थंडी सहन होत नाही म्हनुन ते उष्णतेच्या शोधात मानवीवस्ती कडे तसेच शेतातील कडबा,गुळी, बनिंब गोठा अशा ठिकाणी गरम उब घेण्यासाठी येवु लागले आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात स्वच्छता ठेवून काळजी घ्यावी घराजवळ दगडाविटाचे ढिग व घरावरती कंपाऊंडच्या आत आलेली झाडाची फांदी कट करु घ्यावे तसेच जमीनीवर झोपुनये जरी झोपल्यास भिंतीच्याकडेने जागा सोडुन अंतराने घालावे व मच्छरदानीचा वापर करावे पावसाळ्यामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते.
सिद्धार्थ काळे ,सर्पमित्र
वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर