वीरशैव सांप्रदाय व वारकरी सांप्रदाय हे मुळात शंकरांना आद्य गुरु मानतात.दोन्ही सांप्रदायात कुठलाच भेद नसून.हरिहरा भेद lनाही नका करू वाद ll असे संतांनी सांगितले. गुरुचे महत्त्व,नाम महात्म्म, देहाची नश्वरता,भक्तीचे महत्त्व, संत संगतीचे महत्व, षडरिपूंचा त्याग या बाबींना दोन्ही संप्रदायांनी वर्णील्याचे आढळून येते. लिंगायत सांप्रदाय व वारकरी सांप्रदायाचा मुख्य उद्देश हा मानव कल्याण हाच आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी शिवा संघटना, शिवा कर्मचारी महासंघ, शिवा प्रबोधनकार आयोजित क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेत दिनांक ०८ जून २०२१ रोजी ‘ वीरशैव लिंगायत सांप्रदाय व वारकरी सांप्रदाय तुलनात्मक अभ्यास ‘ या विषयावर २६ वे व्याख्यान पुष्प फेसबुकच्या माध्यमातून गुंफताना केले.
यावेळी पुढे बोलताना प्रा. डॉ. रामकृष्ण बदने म्हणाले की व्याख्यानमाला या प्रकाशवाटा दाखविण्याचे काम करतात. आज आपल्याकडे टी.व्ही. सेट, सोफा सेट,डिनर सेट,टी सेट, आहेत पण आपले माईंड मात्र अपसेट आहे.अशा व्याख्यानमालांच्यामधून व संत साहित्याच्या विचारांमुळे ते सेट होण्यास मदत होते.आज तनाचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक ब्युटी पार्लर निघाले आहेत पण मनाच्या सौंदर्याचे काय? ते सौंदर्य वाढविण्यासाठी अशा व्याख्यानमालेतून संत साहित्यावर प्रकाश टाकला की आपले मन आपोआप सुंदर बनायला लागते. लिंगायत सांप्रदाय व वारकरी सांप्रदायांनी सर्वधर्मसमभाव जोपासला, कुठलाही भेदभाव केला नाही, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटले, स्त्रियांना समानतेची वागणूक दिली, निंदा व स्तुती करू नका, चित्तात समानत्व ठेवा, निर्वैरत्व अंगी बाळगा असे कितीतरी मानवतेचे संदेश ह्या दोन्ही संप्रदायाने सांगितले. खरेच आपण या संप्रदायाच्या तत्वाज्ञानानुसार आचरण केले तर जगात सौख्याचे व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होईल. त्यासाठी आपण सर्व अनुयायांनी या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
या फेसबुक लाईव्ह साठी श्रोते म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्यात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे सर, विठ्ठलराव ताकबिडे,संजय कोठाळे, शिवकुमार स्वामी नळेगावकर महाराज, शिवशरण रटकलकर महाराज, लक्ष्मण विभुते महाराज, मन्मथ आप्पा डांगे महाराज,बाबू पाटील शिवशेट्टे, आशा सरकाळे, शिवराज भोसीकर, विलास कापसे, धाराशिव शिराळे, ताराबाई पाटील, डॉ. शिवानंद स्वामी,राम भातांब्रे व अनेक श्रोते उपस्थित होते. या व्याख्याना दरम्यान जवळजवळ ८७० श्रोत्यांनी या विषयाच्या आणि वक्त्याच्या वक्तव्याच्या संबंधाने कामेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.एक अभ्यास पूर्ण, उत्कृष्ट, चिंतनशील व्याख्यान ऐकायला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रा. डॉ. रामकृष्ण बदने