मुखेड : गाव पातळीवर गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व सरपंचाच्या विविध न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ग्रामसंवाद सरपंच संघाच्या नांदेड जिल्हा कोषाध्यक्षपदी अंबुलगा ता. कंधार येथील उपसरपंच सचिन संभाजीराव गुद्दे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सर्वानुमते निवड ग्रामसंवाद सरपंच संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदिनाथ धामने यांच्या स्वाक्षरीने नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांचे निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री. सचिन गुद्दे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागील सात वर्षापासून गोर-गरीब सर्व सामन्यांची कामे करून गरजू व गरजवंताना मदतीचा हात देऊन सामन्यांच्या सुखा दुखात सहभाग नोंदवून आधार दिल्यामुळे मागील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री सचिन गुद्दे यांना गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवडून देऊन उपसरपंचपदी विराजमान केले आहे. सतत सर्व सामान्य गरिबांच्या कामासाठी धडपड करणारा, झटणारा,कामे करणाऱ्या सचिन संभाजी गुद्दे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची ग्रामसंवाद सरपंच संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदिनाथ धामने यांनी सचिन संभाजीराव गुद्दे यांची नांदेड जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश सचिव विशाल लांडगे पाटील, प्रदेश सदस्य संजय जाधव, जिल्हाध्यक्ष राम मोरे व राहुल वाघमारे आदींसह गावातील प्रतिष्टीत, ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.