राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष मा. शरद पवार यांनी महाआघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असे भाकीत केले. पण लोकांना माहिती आहे की, शरद पवार जे बोलतात ते करीत नाहीत, जे करतात ते बोलत नाहीत आणि त्यांच्या मनात जे असते ते बोलून दाखवत नाहीत. या पार्श्वभूमीवर चर्चा रंगू लागली आहे की, पवार साहेबांच्या मनात आहे तरी काय? सरकार पडेल, सरकार पडेल या भाजपाच्या रोजच्याच केविलवाण्या वल्गनानंतर पवारांनी असे म्हटले. भाजपाशी समर्थनाचे नाटक करुन राष्ट्रवादीने धोका दिला. तरीही भाजपाचा राग शिवसेनेवरच आहे. इतके वर्षे एकत्र राहून कायम विरोधात राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घरोबा केला. एकूणच टीका करण्याची आणि सरकार पाडण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र काम करतील हे कधी कुणाला पटले नसते, पण ते आपण केले. महाराष्ट्रात वेगळ्या विचारांचे सरकार आपण स्थापन केले. आपण दिलेला पर्याय लोकांनी स्वीकारला. तिन्ही पक्ष या पर्यायाच्या बांधिलकीतून योग्यरीत्या पावले टाकीत आहेत. सरकार उत्तमरीत्या काम करीत असून महाविकास आघाडीचे हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल. नुसती पाच वर्षे नाहीत, तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्र काम करून प्रभावीपणे सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व देशात आणि राज्यात करेल, असा विश्वास व्यक्त करणारे मोठे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.
राष्ट्रवादीच्या 22व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. 1977मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षांत तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले, पण राष्ट्रवादीने 22 वर्षं पूर्ण केली. सहकाऱयांच्या कष्टाने, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो, पण त्याचा फारसा काही परिणाम होत नाही.
पक्षातून काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रिमंडळातील अनेक जण नवी जबाबदारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत. एरव्ही हे लोकांसमोर आले नसते. देशात एवढे मोठे संकट आले असताना महाराष्ट्रात गंभीर स्थिती होती. संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी राजेश टोपेंच्या नेतृत्वात आरोग्य खात्याने काम केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली, अशा शब्दांत शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामगिरीचे काैतुक केले.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे जास्त महत्त्वाचे आहे. याचे 100 टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱया सामान्यांचं असून त्यांच्याशी बांधिलकी कायम ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या पण शंका घेणारे वेगळय़ा नंदनवनात राहत आहेत, अशा शब्दांत टीकाकारांचा समाचार घेताना शरद पवार यांनी शिवसेना विश्वासार्ह पक्ष असल्याचे स्पष्ट केले.
माझा शिवसेनेविषयीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो, याचा तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. कोणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेने ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही, असे पवार म्हणाले.
‘मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातांत गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात आपण एका वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे. कधी कोणाला वाटलेही नव्हते की शिवसेना आणि आपण एकत्र काम करू. पण आपण पर्याय दिला आणि सुदैवाने हा पर्याय लोकांनीही स्वीकारला.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी योग्य दिशेने पावले टाकत सरकार चालवले आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झाले, त्यावेळी माध्यमांनी हे सरकार किती महिने, किती दिवस टिकेल यावरून चर्चेचे गुऱ्हाळ चालवले. परंतु सरकारने दोन वर्षांचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केला.
शिवसेनेसोबतचा अनुभव विश्वासाचा शिवसेनेसोबतचा माझा यापूर्वीचा अनुभव विश्वासाचा आहे. देशात जनता पक्षाचे राज्य येऊन गेल्यानंतर देशात ठिकठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला असताना, शिवसेना हा एकमेव पक्ष काँग्रेसला मदत करण्यासाठी पुढे आला आणि विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढविली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता, आणि त्या शब्दाला ते जागले. त्या कालखंडात शिवसेनेने जी भक्कम भूमिका घेतली, त्या भूमिकेला सोडण्याची वागणूक आता होईल असे वाटणारे वेगळ्या नंदनवनात वावरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदी-ठाकरे भेटीबद्दल…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले, की राज्यातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची व्यक्तिगत भेट झाली. त्यानंतर पुन्हा वावड्या उठवणे सुरू झाले. कोणी काही म्हणो, अशा चर्चांचा यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. कारण हे सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिघांचे आहे.
सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होतेमराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जागेचा गंभीर प्रश्न असेल ते आपल्याला सोडवावेच लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे आणि हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एसी, एसटी आणि ओबीसी असतील त्यातल्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे, हे वाटले पाहिजे याची काळजी आपण घेऊया.
शिवभोजनचे कौतुकशिवभोजन थाळी योजनेचा आवर्जून उल्लेख करीत यामुळे कितीतरी गोरगरिबांच्या जेवणाची लॉकडाऊनच्या काळात सोय झाली, असे शरद पवार म्हणाले.
राज्यातील जनता काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर पुढची 25 वर्षे टिकेल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी दिली होती. ते २५ वर्षावरून ५ वर्षांवर का आले अशी चर्चा होत आहे.
यावेळी पवार म्हणाले की होते की, कधी नव्हे ते मिळालेली सत्ता हातून गेल्याने येणारी अस्वस्थता विरोधकांमध्ये या वर्षभरात पाहायला मिळाली. विरोधकांच्या टीकेमुळे अनेकांनी या सरकारविषयी शंका उपस्थित करून ठेवल्या होत्या. त्यामुळेच सरकारसंबंधित चिकित्सा करण्याची भूमिका माध्यमांनीदेखील घेतली. मात्र हे सरकार सगळ्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे गेले आहे.
तसेच हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. सरकारने वर्षभरात संकटग्रस्ताला धीर दिला. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरु आहे.
उद्धव ठाकरेंचं सरकार किती दिवस टिकेल? सरकार बनलंय तेव्हापासून ते आतापर्यंत हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. बहुतांश राजकीय विश्लेषकांकडे त्याचं सोप्पं उत्तरं आहे. शरद पवारांची इच्छा असेपर्यंत. अगदी बरोबर. पण मग पवारांचं मन, इच्छा ह्या सरकारमधून कधी उडेल? पुन्हा त्यांचं नेहमीचं उत्तर येतं, पवारांच्या मनात काय, हे आतापर्यंत कुणाला कधी कळालंय का? खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘हा बारामतीचा तेल लावलेला पैलवान आहे कधी कुणाच्या कचाट्यात सापडायचा नाही.’ बरोबर आहे, जिथं फडणवीसांचं राजकारण अवघ्या सहा महिन्यात आऊटडेटेड झालंय असं वाटतंय, तिथं ५० वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणात कालसापेक्ष राहणं एवढं सोप्पं थोडंच आहे? पण म्हणून पवारांच्या मनात काय हे कळणार नाही?
हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का आणि पवारांची इच्छा कधीपर्यंत असणार? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, भाजपा हा सत्तापिपासू पक्ष आहे. थोड्या फार फरकानं सगळे तसेच असतात. त्यांनी कर्नाटकात, मध्यप्रदेशात जे केलं ते पाहाता तशा हालचाली ते महाराष्ट्रात करणार नाहीत याची काही खात्री नाही. पण हे वाटतं तेवढं सोप्पही नाही. कोरोना आटोक्यात आणण्यात उद्धव सरकारला अपयश आलंय आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली तर अशीच अवस्था गुजरातमध्ये आहे, दिल्लीत झाली त्याचं काय? पण भाजपाने नैतिकतेचे सोवळे काढून ते कधीच खुंटीवर टांगलेत. तसं नसतं तर पहाटे त्यांनी अजित पवारांसोबत शपथविधी केला असता का? त्यामुळे त्यांना करायचं झालं की ते करतीलच. फक्त त्याचं टायमिंग कोरोना असणार नाही हे निश्चित.
पुढील शंभर वर्षात राज्यात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाहि, असे हास्यास्पद विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले असले तरीही राज्यात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या वादळापूर्वीची शांतता आहे की काय, असे वाटू लागले आहे. राऊत यांना आता कुणीही गांभिर्याने घेत नाहि आणि स्वतःल मुख्यमंत्रि तरी त्याना फारसे गांभिर्याने घेत असतील, असे वाटत नाहि. राऊत हे सरकारमध्ये असून पक्षात आहेत आणि पक्षात असून सरकारमध्ये असल्यासारखे भासवतात. त्यांच्या वक्तव्यांना राजकीय नेत्यांनी मनावर घेणे कधीचेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचे जाऊ द्या. तरी राऊत यांनी शंभर वर्षांचीच हमी दिली आहे. आचार्य अत्रे असते तर कदाचित पुढील दहा हजार वर्षात विरोधकांची सत्ता येणार नाहि, असेही म्हणाले असते. परंतु राज्यात राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक सिल्व्हर ओकमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि मविआ सरकारचे तारणहार शरद पवार यांची भेट घेतली. सध्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कटुता खूपच कमी झालेली दिसते आहे.
राष्ट्रवादीचे नेते भाजपवर थेट आरोप करताना दिसत नाहित. पंतप्रधान मोदींवर तर आरोप राष्ट्रवादीचा एकही वरिष्ठ नेता करताना दिसत नाहि. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी पवार गांधीनगरला केंद्रिय गृहमंत्रि अमित शहा यांची भेट घेऊन आले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांचा एकमेकांबद्दलचा सुर मवाळ झालेला दिसतो आहे. हे कशाचे लक्षण आहे, हे सारे जण जाणतात. त्यामुळेच कदाचित राऊत यांच्या पोटात गोळा आला असेल. फडणवीस यांनी पवार यांची सध्याच्या राजकीय कटुता शिगेला पोहचलेली असताना भेट घेणे अत्यंत महत्वाची घडामोड आहे.
फडणवीस यांनी पवार यांची सध्याच्या राजकीय कटुता शिगेला पोहचलेली असताना भेट घेणे अत्यंत महत्वाची घडामोड आहे. फडणवीस यांनी या भेटीला राजकीय अर्थ देऊ नका, वगैरे नेहमीप्रमाणे वक्तव्य केले असले तरीही त्यात काहीच अर्थ नसतो, हे लहान मूलही आता समजते. पवार आणि फडणवीस यांच्या भेटीने कदाचित शिवसेनेला संदेश दिला असावा. शिवसेना सध्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. खुद्द मुख्यमंत्रि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. माजी गृहमंत्रि अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यास विलंब झाल्यामुळे ठाकरे नाराज होते, असे सांगितले जाते. मुळात ठाकरे हे केवळ पवार यांच्या राजकीय मोर्चेबांधणीने मुख्यमंत्रि होऊ शकले आहेत. त्यामुळे ठाकरे खुद्द पवार यांच्यावरच नाराज होत असतील तर पवार ते सहन करणार नाहित. त्यामुळे फडणवीस भेटीने ठाकरेंना खरा इषारा दिला आहे, असे दिसते आहे. राजकीय वर्तुळात विविध चर्चा आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर असलेला ओबीसी समाज नाराज आहे. ओबीसीचा सारा राग महाविकास सरकारवरच आहे.
खरेतर छगन भुजबळ यांनी ओबीसींवर अन्याय झाल्याप्रकरणी तोंडही उघडलेले नाहि. या क्षणी ते जर मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले तर ते नायक ठरतील. परंतु त्यांना सत्ता सोडवत नाहि. त्यांचे जाऊ द्या. ओबीसी समाज नाराज आहे तर मराठा समाज तर संतप्त आहे. फडणवीस यांच्या काळात जवळपास निश्चित झालेले मराठा आरक्षण मविआ सरकारच्या नाकर्तेपणाने गेले, अशी मराठ्यांची भावना आहे. त्याचा फटका कधीही निवडणुका झाल्या तर सरकारला बसणार आहे. यामुळे खुद्द पवारांनाच आता या सरकारबद्दल खात्री वाटत नाहि की काय, अशी शंका वाटते. शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर गेलो तर निवडणुकीत आपल्याला साफ झोपावे लागेल.
पवारांना तर अगोदरच सारे समजत असते. त्यामुळे महाविकास सरकार हे बुडते जहाज असल्याचे त्यांना वाटत असेल तर सांगता येत नाहि. परंतु पवार हे आपल्या खर्या भावना कधीही बोलून दाखवत नाहित. महाविकास सरकार पंचवीस वर्षे, आता शंभर वर्षे टिकेल, अशी आचरट विधाने राऊत करत असले तरीही पवार यांनी हे सरकार पाच वर्ष काढेल, असेही विधान एकदाही केलेले नाहि. यावरून खुद्द पवारांनाच सरकारबद्दल विश्वास वाटत नाहि, असा अंदाज लावता येतो. तिकडे काँग्रेसही नाराज आहे. आणि काँग्रेसचे मंत्रि नितीन राऊत यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्याने पवार अस्वस्थ असावेत. अर्थात या सार्या राजकीय वर्तुळात रंगणार्या चर्चा असल्या तरीही आग लागल्याशिवाय धूर होत नाहि, असे म्हणतात. काँग्रेसचे मंत्रि सरकारमध्ये नाराज आहेत. एकापाठोपाठ एक राज्ये काँग्रेसच्या हातून चालली आहेत. पंजाबमध्ये सव्वीस आमदारांनी बंड पुकारण्याच्या पवित्र्यात आहेत. मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात आडवा विस्तव जात नाहि. त्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेस आपलेच घर सावरण्याच्या प्रयत्नात आहे. नेतृत्वाचा पेच काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही या सरकारमधून बाहेर पडू शकते. ही सर्व परिस्थिती पहाता पवार आणि फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, हे मात्र खरे आहे. त्यातच फडणवीस यांनी जळगावच्या दौर्यावर असताना त्यांचे ज्यांच्याशी तीव्र वितुष्ट आहे, त्या माजी मंत्रि एकनाथ खडसे यांची भेट घेतली. हाही मुद्दा शिवसेनेच्या पोटात गोळा आणणारा आहे. त्यामुळे राऊत काहीही म्हणत असले तरीही ही वादळापूर्वीची शांतता आहे का, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय