कंधार नगरपालिका सफाई कामगार शंकर मोरे सेवानिवृत्त

कंधार/प्रतिनिधी


कंधार नगर परिषदेतील सफाई कामगार शंकर माणिकराव मोरे ४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल आज साठे नगर येथील अण्णा भाऊ साठे समाजमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कंधार शहरातील साठे नगर येथील शंकर माणिकराव मोरे हे १ मार्च १९८१ रोजी नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून रुजू झाले.कंधार नगरपालिकेला स्वच्छते बद्दल बरेचशे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले या पुरस्कारात श़कर मोरे यांचा सिंहाचा वाटा राहिला.कंधार शहरातील गल्लो गल्लीत स्वच्छतेच्या माध्यमातून शंकर मोरे यांनी समाज सेवा केली.त्यांनी कंधार शहराच्या स्वच्छतेत झोकुन देवून काम केले.आज या सेवेला तब्बल ४१ वर्ष पुर्ण झाले.अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जिवन जगत असतांनाच नगरपरिषदेत दोन वर्ष रोजंदारीवर काम केले.त्यानंतर सेवेत कायम झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *