ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन संपन्न
लोहा प्रतिनिधी ,, शैलेश ढेबंरे
लोहा तालुक्यातील बेरळी गावा जवळ श्री संत धोंडूतात्या महाराज वारकरी शिक्षण संस्था मागील चार वर्षांपूर्वी चालू केली होती आतापर्यंत या संस्थेमध्ये खूप विद्यार्थी घडले यामध्ये प्रामुख्याने गायन मृदंग वादक कीर्तनकार असे विद्यार्थी घडले आज या वारकरी शिक्षण संस्थेचा चौथा वर्धापन दिन या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनाथ मुलांना वर्षभर फ्री प्रवेश दिला जातो आज या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हरिभक्त पारायण मधुकर महाराज सायाळ कर यांचे कीर्तन झाले,
या कार्यक्रमाला उपस्थित गायनाचार्य भगवान महाराज ईसादकर दिलीप महाराज गंगनबीड कर कैलास महाराज पोळ युवा कीर्तनकार शंकर महाराज लोंढे पप्पू महाराज पोले नादब्रह्म सदानंद गुरुजी रायवाडीकर गणेश महाराज मालेगावकर सुधीर महाराज पळशीकर बाळासाहेब महाराज कुलकर्णी राहुल महाराज नावलगावकर माणिक महाराज सायाळकर मृदंगाचार्य विशाल महाराज बाभुळगावकर केदार महाराज सुगावे विठ्ठल महाराज तांबे लहु महाराज शिरसीकर मरूळ सिद्ध महाराज पळसकर रामनाथ महाराज सादलापूर योगेश महाराज नंदू महाराज रणजीत पाटील पवार योगेश कानगुले सुदाम पाटील बुद्रुक आबा पाटील ढेंबरे मुन्ना शिंदे वनराज बेराडे आदिनाथ पवार ,संस्थेचे गुणवंत विद्यार्थी माधव महाराज गिते घनश्याम महाराज बेटकर आधी गुनिजन मंडळी उपस्थित होत.