कंधार नगरपालीकेच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

कंधार नगरपालीकेच्या वतीने आज रविवार दि.१३ जुन रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली.शहरातील सर्व महामानवाच्या पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आले.

कंधार नगरपालीकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंती निमित्य नगरपालीका कार्यालयात महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व शहारातील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रतापसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.त्याबरोबरच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासही यावेळी अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार, नगराध्यक्षा सौ.शोभाताई अरविंदराव नळगे यांचे प्रतिनिधी नगरसेवक शहाजी नळगे ,नगरसेवक डॉ.दिपक बडवणे,गणेश कुंटेवार,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,योगेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह समाज बांधव ,नगरपालीका कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *