महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहावे – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

नांदेड ; प्रतिनिधी

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून अ.भा. क्षत्रीय महासभेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर यांनी सफाई कामगारांना छत्री वाटपाचा घेतलेला कार्यक्रम अतिशय स्तुत्य असून हिंदू बांधवांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन राष्ट्राच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असावे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले.

सिडको येथील महाराणा प्रतापसिंह पुतळ्याला सुरुवातीला दिलीप ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सुषमा ठाकूर यांनी छत्री वाटप करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी दिलीप ठाकूर ,सिडको भूषण करणसिंह ठाकूर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शितल भालके,
प्रसिद्ध उद्योजक प्रकाशसिंह परदेशी यांनी आपल्या भाषणातून महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. दत्तात्रय देबडवार, बालाजीसिंह चौहान, अशोकसिंह चौहान,नंदा चौहान, जयश्री ठाकूर, निर्मला चौहान, बबीता परिहार, रमा ठाकूर, शोभा चौहान, सविता बायस
यांच्या हस्ते सफाई कामगारांना छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजानन चंदेल यांनी तर आभार मिथलेश चौहान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंदसिंह ठाकूर, सचिनसिंह चौहान, निरजसिंह तौर, बालाजीसिंह ठाकूर, शुभमसिंह ठाकूर, राहुलसिंह चंदेल यांनी परिश्रम घेतले. पावसाळ्यापूर्वी छत्र्या मिळाल्यामुळे सुषमा ठाकूर यांचे सफाई कामगारांनी धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *