तिफण ; सर्जा-राजा तिफण ओढतांनाच, आनंदीत शेतकरीराजा पेरतांना! चातक पक्षी अतूर पावसाच्या, पाण्याचा थेंब चोचीत झेलतांना!…. दत्तात्रय एमेकर यांचे शब्दबिंब

रविवार ॥ शब्दबिंब ॥ दि. 13/6/2021

आकाशात गर्दरंगी मेघांची गर्जना, तिफण जुंपण्याला सांगतेच ना! मृदा मॉ शेतकर्यांची रे धनलक्ष्मी, रुजल्याने अंकूर फुटतो बीयांना! सर्जा-राजा तिफण ओढतांनाच, आनंदीत शेतकरीराजा पेरतांना! सरत्याच्या पन्हाळीने खत पेरता, बाळसे येते अंकुरलेल्या पिकांना! चातक पक्षी अतूर पावसाच्या, पाण्याचा थेंब चोचीत झेलतांना! खरीप पिकांची पेरणी झाल्याने, हर्षानंद बळीराजांच्या जीवना!

गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुर, ता. कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *