बिलोली ; प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा तसेच लोहगाव जिल्हा परिषद मधील काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.
यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत,माजी मंत्री रमेशजी बागवे,आ.मोहनअण्णा हंबर्डे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण,विधानपरिषद प्रतोद आ.अमरनाथजी राजूरकर,मा.आ.हाणमंतराव बेटमोगरेकर,जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,जि.प.सभापती संजयजी बेळगे,जि.प.सभापती रामरावजी नाईक,किशोरजी स्वामी,केदार पाटील साळुंके,उद्योजक मारोतराव कवळे,देगलुर नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,माजी नगराध्यक्ष मैथीलीताई कुलकर्णी,बिलोली तालुकाअध्यक्ष शिवाजी पाटील पाचपीपळीकर,देगलुर तालुकाअध्यक्ष प्रितम देशमुख,जि.प.सदस्य दिलीप बंदखडके,सभापती गिरीधर पा.सुगावकर,पं.स.उपसभापती शंकर यंकम,मसुद देसाई,विजय पाटील,जिल्हा सरचिटणीस गिरीधर डाकोरे,संभाजी पा भिलोंडे,जिल्हा प्रवक्ते दिलीप पांढरे,विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जनार्दन बिरादार, बस्वराज पा वन्नाळीकर,संतोष पा.खतगावकर,संतोष पाटील,गंगाधर सोंडारे सर्व काॅंग्रेस पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..