नांदेड ; प्रतिनिधी
उच्चभ्रूचा क्लब अशी
लॉयन्स क्लबची पूर्वी तयार झालेली प्रतिमा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेल्या लॉयन्सच्या डब्यामुळे तळागाळातील लोकांच्या सेवेसाठीचा क्लब अशी बदलली असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी ६१ दिवसापासून सुरू असलेल्या लॉक डाउन मधील लॉयन्सच्या डबा
उपक्रमाचा समारोप प्रसंगी केले.
नांदेड येथील मध्यवर्ती बस स्थानकात झालेल्या शानदार कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर लॉयन्स प्रांतपाल दिलीप मोदी, योगेश जैस्वाल, लॉयन्स सेंट्रल चे अध्यक्ष संजय अग्रवाल,लॉयन्स अन्नपूर्णाचे अध्यक्ष नागेश शेट्टी, भाजप संघटन सरचिटणीस विजय गंभीरे,सरचिटणीस अशोक धनेगावकर ही विराजमान होते. सुरवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना असे सांगितले की, गेल्या ६१ दिवसापासून सुरु असलेल्या या उपक्रमात चाळीस हजारापेक्षा जास्त जेवणाचे डबे दिले आहेत.
भाऊचा डबा,लॉयन्सच्या डबा,आधार गरजूंना मार्फत १२ वर्षात लोकसहभागातून चार लाखापेक्षा जास्त नागरिकांना जेवण देण्यात आल्याचे आवर्जून सांगितले. प्रविण साले व दिलीप मोदी यांनी आपल्या भाषणात दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण सेवाकार्याचे भरभरून कौतुक केले. समारोपाच्या दिवशी गुलाबजामूनचे सहाशे मिष्टान्न भोजन व पाण्याची बाटली दिपक रंगनानी,मुकेश अग्रवाल, अनिल हजारी,बागड्या यादव,व्यंकटेश जिंदम, मनोज जाधव, निळू पाटील ,शततारका पांढरे, अपर्णा चितळे, अश्विनी महाले,अनिल गाजुला, कुणाल गजभारे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दिलीप ठाकूर यांच्या समवेत दरररोज डबे वितरण करणारे अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, प्रशांत पळसकर, कामाजी सरोदे,
मन्मथ स्वामी, राज यादव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धीरज स्वामी तर आभार अनिल चिद्रावार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, माधव लुटे, विशाल काबरा यांनी परिश्रम घेतले.
(छाया: करणसिंह बैस, व्यंकटेश वाकोडीकर)