शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा अवलिया म्हणजे किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर

लोहा / प्रतिनिधी


लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा अवलिया म्हणजे शिवसेना प्रणित किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर आहेत.x
लोहा तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांची शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अफाट निष्ठा असलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले चंद्रकांत पाटील आडगावकर हे विद्यार्थी दशेपासुनच शिवसेने कट्टर कार्यकर्ते आहेत .


शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना प्रेरणास्थान मानून पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरवातीला युवासेनेत कार्य केले .
त्यानंतर शिवसेनेचे खा. हेमंत भाऊ पाटील, शिवसेनेचे लोहा – कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत कार्य करीत असताना त्यांनी शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात , आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला विशेष म्हणजे शेतकऱ्यां बदल त्यांना विशेष तळमळ व कार्य करण्याची आवड असल्यामुळे त्यांच्यावर शिवसेना पक्षाने शिवसेना प्रणित किसान सेनेचे तालुकाप्रमुख प्रमुख म्हणून निवड केली.
किसान सेनेच्या लोहा तालुका प्रमुख पदी निवड झाल्यांने शिवसेना पक्ष नोंदणी बरोबरच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविले शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मानले
यात गेल्या वर्षी लोहा तालुक्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात
लोहा तालुक्यात ढगफुटी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यावेळी किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी प्रत्यक्ष आडगाव, बोरगाव, पांगरी, धानोरा आदी गावांतील शेतकऱ्यां च्या बांधावर जाऊन पाहणी केली शेतकऱ्यांना बांधवांना धीर दिला लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे अनुदान मिळावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली ती शासनाने मान्य करून लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करुन दिले.


तसेच आता लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा खरीप पिकांचा विमा मिळावा , शेतकऱ्यांना पिक कर्ज व डीएपी खत मिळावे म्हणून अशी त्यांनी मागणी केली आहे त्यांच्या मागणीला यश ही मिळेल
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व शिवसेना पक्षासाठी सत्तत कार्य करणारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा अवलिया म्हणजे शिवसेना प्रणित किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर असुन आज या युवा नेतृत्वाचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा .

प्रभाकर राऊत
शिवसेना उपतालुकाप्रमुख लोहा
रा. सावरगाव ( न.) ता. लोहा जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *