मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कंधार( प्रतिनिधी)

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस आ. शिंदे यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यानी लोहा कंधार मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठया उत्स्फूर्त पणे साजरा केला. नांदेड येथील आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ,लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे समर्थक ,कार्यकर्त्यानी गावात वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले ,हरबळ येथे उपसरपंच अवधूत पा. शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले,महेश पिनाटे यांनी कंधार ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करून कार्यकर्त्यानी वाढदिवस साजरा केला, लोहा येथे अनाथ आश्रम मध्ये फळे व मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला, लोहा व कंधार मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या अनेक समर्थकांनी मोठ्या उत्साहात मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला कोरोनाच्या गंभीर संकटात वाढदिवस साजरा करणार नसल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या आगोदर मतदारसंघातील कार्यकर्त्याना व त्यांच्या हजारो समर्थकांना सूचित केले होते, कोरोनाच्या गंभीर संकटात आमदार शामसुंदर शिंदे यांच्या लोहा, कंधार मतदार संघातील हजारो समर्थकांनी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमाचे व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *