सर्व राजकीय पक्षांनी या अन्यकारक प्रस्तावाला विरोध करावा !
लोहा (प्रतिनिधी )
तालुक्यतील उर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे पाणी लातूर शहराला पाणीपुरवठा योजना मंजुरीचा प्रस्ताव उद्या दिनांक 16 जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 15 रोजी लोहा शहरात लोहा, कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरातील भाजी मंडई चौकात रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती ,
यावेळी रास्ता रोको आंदोलनात उपस्थितांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की लोहा ,कंधार मतदारसंघाला सिंचनाच्या बाबतीत सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी लोहा, कंधार मतदारसंघाचे चे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे साहेब अहोरात्र परिश्रम करून मतदारसंघातील पाणी समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पाचे पाणी लातूर शहराला देणे म्हणजे लोहा-कंधार मतदार संघातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर घोर अन्याय करणे आहे ,हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नसून येणाऱ्या काळात लिंबोटी धरणाचे पाणी लोहा- कंधार मतदार संघासाठी कायम आरक्षित राहिलेच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे, या अगोदर लिंबोटी धरणाचे पाणी पालम, उदगीर साठी देऊन लोहा- कंधार मतदारसंघावर अन्यायच केला होता, परत आता लातूर शहरासाठी लिंबोटी धरणाचे पाणी पुरवठा प्रस्ताव उदयचा मंत्रIमंडळ बैठकीत प्रस्तावित असल्याने जर या धरणाचे पाणी लातूर शहराला दिले तर लोहा कंधार तालुक्याचे वाळवंट होण्यास कदापि वेळ लागणार नसल्याचे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी स्पष्ट केले असून कोणत्याही परिस्थितीत उर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे पाणी लातूर शहराला जाणार नसल्याची दक्षता स्वतः आमदार शामसुंदर शिंदे हे घेत असून काल तडकाफडकी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मुंबई येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन उद्या मंत्रिमंडळात सादर करण्यात येणारा लातूर शहराला पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी विनंती करणारा असून वेळप्रसंगी सभागृहात आ. शिंदे लक्षवेधी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण व याभागाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रस्तावाचा निषेध केला यावेळी कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे ,लोहा खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार,शेकापचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर ,नगरसेवक संभाजी चव्हाण, माजी नगरसेवक रमेश माळी, माजी नगरसेवक युवराज वाघमारे,सरपंच प्र.पुंडलिक पाटील संचालक सुधाकर सातपुते,माळकोळी चे सरपंच मोहन शूर, जिल्हाध्यक्ष शेरू भाई वैभव हाके, केशव तिडके,सचिन क्षिरसागर,सिद्धू पाटील वडजे, माधव बाबर, डोंगरगावचे सरपंच धर्मापुरे, उपसरपंच दत्ता बगाडे, निखिल मस्के, माधव घोरबाड पुंडलिक पाटील,अशोक सोनकांबळे, आनंद देशमुख, बाळू आनंदवाड बंटी गादेकर ,अवधूत पेठकर प्रसाद जाधव, अमोल गोरे, या भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.