आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलवळ येथे वृक्षारोपण

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

   कंधार- लोहा तालुक्याचे चे लोकप्रिय आमदार  श्यामसुंदर शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त फुलवळ येथे कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

ग्रा.प.सदस्य प्रविण मंगनाळे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . त्यात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली .

याप्रसंगी वृक्षारोपण हे जेष्ठ नागरिक नारायण शेंबाळे, ज्ञानोबा मंगनाळे, ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बंटी गादेकर, सा.वि.जिल्हाध्यक्ष नविन बनसोडे, नागेश गोधने,संदीप मंगनाळे, संतोष तेलंग,नीळकंठ मंगनाळे,सागर मंगनाळे, ग्रा.प.सदस्य श्रीकांत मंगनाळे, धोंडीबा फुलवळे, योगेश मंगनाळे, मारोती फुलवळे, नारायण फुलवळे, शकील दुर्वेश, मनोहर जाधव, बाळू जलेवाड, वसंत मंगनाळे, पत्रकार दिगंंबर डांगे सह गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *