कंधार (दि. 15 जुन ) गेली अडीच ते तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे शासकीय कार्यालयात कर्मचारी – अधिकारी यांची 15 % उपस्थिती असल्या कारणाने घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे बिले रखडले आहे. रखडलेली बिले काढण्या करिता दि. 17 जुन गुरुवारी वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती कंधार येथे घरकुल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची बैठक बोलावली असुन बिले रखडलेल्या फुलवळ गणातील लाभार्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण यांनी केले आहे.
▶ कोरोना संकट काळात रखडलेल्या पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल योजनेतील लाभार्थीचे बिले रखडले आहेत. ही योजना पूर्ववत करून पूर्ण – अपूर्ण घरकुलाचे बिल बिल काढण्यासाठी, फुलवळ गणातील फुलवळ, जंगमवाडी, बीजेवाडी, शेकापूर, संगमवाडी, तळ्याचीवाडी, पाताळगंगा, उमरज, नागलगाव ग्रामपंचायत मधील वाडी – तांडे व गावातील घरकुल लाभार्थीनी. वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती कंधार येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वा. या वेळेत उपस्थित राहावे असे अहवान पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी केले आहे.