कंधार ; प्रतिनिधी
प्रति पंढरपूर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र उमरज संस्थान चे मठाधिपती महंत श्री गुरूवर्य एकनाथ नामदेव महाराज उमरजकर यांच्या अभीष्टचिंतन सोहोळ्याच्या निमित्ताने आज दिनांक 16 जून 2021 रोज बुधवार या दिवशी श्री नवनाथ पाटील तोरणे यांच्या नेतृत्वाखाली कंधार येथील रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. सुर्यकांत लोणीकर , डॉ.कैलास पाटील फाजगे, यांच्या प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास पुजारी हरी महाराज, परशुराम केंद्रे, माऊली तिडके, तिरुपती पाटील भुत्ते,अमित पाटील मोरे, गोपीनाथ केंद्रे ज्ञानेश्वर पाटील तोरणे, पुंडलिक कागने,वैभव सुर्यवंशी व महाराष्ट्र वारकरी महामंडळ,कंधारचे तालुका अध्यक्ष योगिराज स्वामी व ईतर शिष्य मंडळी उपस्थित होती.
